पत्नीची अजब कहाणी: घटस्फोटासाठी पतीला दिले ५० हजार..!

By नम्रता फडणीस | Updated: February 27, 2026 22:55 IST2026-02-27T22:51:41+5:302026-02-27T22:55:02+5:30

एकाच गल्लीत राहात असल्याने दोघे प्रेमात पडले अन् दोघांनी पळून जाऊन १९ एप्रिल २०२४ ला कोर्ट मॅरेज केले.

pune crime news wifes strange story: She gave her husband 50 thousand for divorce | पत्नीची अजब कहाणी: घटस्फोटासाठी पतीला दिले ५० हजार..!

पत्नीची अजब कहाणी: घटस्फोटासाठी पतीला दिले ५० हजार..!

पुणे : घटस्फोटाचा दावा दाखल केला की, घटस्फोटानंतर मागणीनुसार पत्नीला पतीकडून पोटगी मिळत असल्याचे सर्वश्रुत आहे. पण, जर घटस्फोट मिळण्यासाठी पत्नीने पतीला रक्कम दिली तर?... ऐकून काहीसे विचित्र वाटेल. पण असे प्रत्यक्षात एका जोडप्याबाबत घडले आहे. विशेष विवाह कायद्यानुसार प्रेमविवाह केलेल्या जोडप्यामधील तरुणी घरच्यांच्या दबावाला बळी पडली आणि तिने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. मात्र, तरुण तिला नांदवायला तयार होता. तिला नांदायचे नव्हते. अखेर तिने त्याला कारण नसताना कोर्टात खेचल्याने तिनेच त्याला ५० हजार रुपये खटल्याचा खर्च द्यायचा, अशी अट टाकली आणि तिने रक्कम देण्याचे मान्य केल्याने दोघांचा घटस्फोट मंजूर झाला.

स्मिता आणि राकेश (नावे बदललेली) दोघांची जात भिन्न. एकाच गल्लीत राहात असल्याने दोघे प्रेमात पडले अन् दोघांनी पळून जाऊन १९ एप्रिल २०२४ ला कोर्ट मॅरेज केले. त्यांनतर दोघे आपापल्या घरी राहू लागले. अगदी ' साथिया ' चित्रपटासारखेच हे कथानक. दोघांनाही एकत्रित राहण्याचे धाडस झाले नाही. मुलीने लग्न केल्याचे आईला सांगितले. त्यांच्या लग्नाला विरोध झाला. तरुणी माहेरच्या विरोधाला तोंड देऊ शकली नाही. जात वेगळी असल्याने तिच्या आईने तरुणीला भडकविले आणि तरुणीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची केस दाखल केली. तरुणाला नोटीस मिळाली. तरुण तिला नांदावायला तयार होता, पण तिलाच जायचे नव्हते. त्याने न्यायालयातील दोन्ही तारखांना येणे टाळले. त्यांनतर तरुणाने अँड. नीता भवर यांच्यामार्फत न्यायालयात वकीलपत्र दाखल केले. घटस्फोटापूर्वी जोडप्याचे समुपदेशन केले जाते. मात्र समुपदेशकांनाही त्यांच्यात समेट घडवून आणण्यात यश आले नाही. अखेर अँड. भवर यांनी दोन्ही पक्षाकरांसह पत्नीच्या वकिलांना एकत्र करून बैठक घडविली आणि तरुणीने तरुणाला ५० हजार रुपये लिटिगेशन खर्च देण्याचे ठरले. तरुणीने रक्कम दिल्यावर एका दिवसात परस्पर संमतीने जोडप्याला घटस्फोट मंजूर केला. 

पती पत्नीला नांदवायला तयार होता. पण ती जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे तिच्याकडून पोटगी, स्त्रीधनाचे हक्क काढले आणि तिच्याकडून ५० हजार रुपये लिटिगेशन खर्च घेण्यात आला. घरच्यांना न सांगता पळून जाऊन कोर्ट मॅरेज करणा-या जोडप्यांसाठी डोळ्यात अंजन घालणारी ही केस ठरली आहे.  - अँड. नीता भवर, पतीच्या वकील

Web Title : अजीब तलाक: पत्नी ने पति को तलाक के लिए दिए ₹50,000!

Web Summary : पुणे में, पारिवारिक दबाव के बाद एक पत्नी ने तलाक के लिए अपने पति को ₹50,000 दिए। सुलह की उसकी इच्छा के बावजूद, उसने अलग होने पर जोर दिया। अदालत ने उसके कानूनी खर्चों को कवर करने पर सहमति के बाद तलाक दे दिया।

Web Title : Strange Divorce: Wife Pays Husband ₹50,000 for Divorce!

Web Summary : In Pune, a wife paid her husband ₹50,000 for divorce after facing family pressure. Despite his willingness to reconcile, she insisted on separation. The court granted the divorce after she agreed to cover his legal expenses.