शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Video : व्हायरल वक्तव्य पडले महागात..! वसंत मोरे यांचा जामीन फेटाळला; अटकेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 12:34 IST

सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य पडले महागात; वसंत मोरे यांना अटकेची शक्यता

पुणे -  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वक्तव्यामुळे वसंत कृष्णाजी मोरे यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने, आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ तुकाराम लहाडे (वय ७२) यांच्या तक्रारीनंतर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिकच्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांनी कथितपणे विश्वनाथ लहाडे यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. तक्रारीनुसार, लहाडे हे अनुसूचित जातीतील असल्याची माहिती असतानाही जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने वक्तव्य करण्यात आले. या वक्तव्यात “दारू पिऊन बोलू शकत नव्हते” तसेच “ओढ्यात उतरून गटारे साफ करत होते” अशा शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.दरम्यान, वसंत मोरे यांनी अटक टाळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यामुळे आता पोलिसांकडून पुढील कारवाई वेगाने होण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला असून, संबंधित पुरावे आणि व्हायरल व्हिडिओची पडताळणी केली जात आहे. फिर्यादींच्या मते, या व्हायरल व्हिडिओमुळे त्यांची सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात आली असून कुटुंबावर मानसिक ताण निर्माण झाला आहे. सध्या कुटुंब भीतीच्या वातावरणात असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vasant More's bail rejected after viral statement; arrest likely.

Web Summary : Vasant More faces arrest after his anticipatory bail was rejected following a complaint under the Atrocity Act for allegedly making derogatory remarks against Vishwanath Lahade at a press conference. The viral video has caused social unrest and mental distress.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याVasant Moreवसंत मोरे