दौंड : दौंड येथील रेल्वे ग्राउंड परिसरात सुमारे ८० हजार रुपये किमतीचे बेकायदेशीर ९ एमएमचे रिव्हाॅल्व्हर बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी फरार झाला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली. या प्रकरणात इरफान खान (वय २२) आणि विशाल काटकर (वय ३०, दोघेही राहणार दौंड) या दोघांना अटक करण्यात आली आहे, तर सोनू ताडे (रा. कुंभारगली, दौंड) हा फरार आहे.
यातील आरोपी इरफान खान हा त्याच्या कब्जात बिगर परवाना बेकायदा पिस्टल बाळगून असल्याचे आढळून आले. त्याच्याकडे चौकशी केली असता, सदरची रिव्हाॅल्व्हर विशाल काटकर यांनी ठेवण्यासाठी दिल्याचे सांगण्यात आले. तसेच विशाल काटकर याच्याकडे चौकशी केली असता, तो म्हणाला की मला सोनू ताडे याने ठेवण्यास दिले आहे, त्यामुळे सोनू ताडे हा फरार असून, त्याला पकडल्यानंतर या बेकायदेशीर रिव्हाॅल्व्हरचा नेमका तपास लागण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद शिरसागर, स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस निरीक्षक गोपाळ पवार, दौंड पोलिस स्टेशन, पोलिस उपनिरीक्षक रुपेश कदम, सहायक पोलिस फौजदार असिफ शेख, पोलिस हवालदार सचिन घाडगे, संजय कोठावळे, योगेश नागरगोजे, अजित भुजबळ, किरण राऊत, आमिर शेख, अक्षय कुंभार, संजय कोठावळे यांनी केली आहे.
Web Summary : Two individuals were arrested in Daund for possessing an illegal 9mm revolver worth ₹80,000. A third suspect is on the run. Police investigation is ongoing to find the source of the weapon.
Web Summary : दौंड में 80 हजार रुपये की अवैध 9 एमएम रिवॉल्वर रखने के आरोप में दो लोगों को गिरफ्तार किया गया। एक संदिग्ध फरार है। हथियार के स्रोत का पता लगाने के लिए पुलिस जांच जारी है।