शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट पीडितेचा लेटर बॉम्ब..! पुणे पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हणाली, ‘थोडा उशीर झाला म्हणून..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:35 IST

स्वारगेट प्रकरण : ‘आरोपीने दोनदा बलात्कार करून तिसऱ्यांदा…’ पत्रातून पीडितेचा मोठा खुलासा

- किरण शिंदेपुणे - पुण्यातील स्वारगेट परिसरात घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीने पत्राद्वारे पुणेपोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या पत्रात तिने वैद्यकीय चाचणी, पोलिसांची भूमिका आणि सरकारी वकिलांच्या नियुक्तीबाबत तिला आलेल्या अडचणी स्पष्ट केल्या आहेत. पीडितेने तिच्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांकडून तिला उशीर झाल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. या आरोपांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने तिच्या पत्रात वैद्यकीय आणि पोलीस प्रक्रियेतील त्रासदायक अनुभव स्पष्टपणे मांडले आहेत. वैद्यकीय चाचणीबाबत तिने सांगितले आहे की, पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्या इच्छेविरुद्ध तपासणी केली. तसेच पोलिस चौकशीदरम्यान तिला अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांसमोर अत्याचाराच्या घटनांचे तपशीलवार वर्णन करावे लागले.

पीडितेने तिच्या पत्रात अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करताना म्हटले आहे की, आरोपी दत्ता गाडे याने दोनदा बलात्कार केल्यानंतर पुन्हा लैंगिक जबरदस्तीचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेच्या जोरदार प्रतिकारामुळे तो पळून गेला, असे तिने नमूद केले आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी गाडेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

या पत्रात सरकारी वकिलांच्या नियुक्तीबाबतही पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी तिला तीन वकिलांची नावे सुचवली, परंतु तिने असीम सरोदे यांची मागणी केली असता, तिला उशीर झाल्याचे सांगण्यात आले. “माझा वकील निवडण्याचा अधिकार नाही का?” असा प्रश्नही तिने पत्रातून उपस्थित केला आहे.

दरम्यान, अत्याचाराच्या घटनेदरम्यान झालेल्या मानसिक स्थितीबद्दलही तिने पत्रात लिहिले आहे. ती ओरडली असता तिचा आवाज अचानक बसला आणि निघेनासा झाला. त्याचवेळी विरोध केल्यामुळे मारल्या गेलेल्या अन्य पीडितांची आठवण तिला झाली. त्यामुळे आपला जीव वाचवणे तिला अधिक महत्त्वाचे वाटले, असेही तिने नमूद केले आहे.

पोलिसांची भूमिका संशयास्पद?

पीडितेच्या आरोपांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अत्याचारग्रस्त महिलांना न्याय मिळावा यासाठी तिने स्वतः सरकारी वकील निवडण्याचा अधिकार असावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांच्या भूमिकेवर आणि पीडितेच्या मागण्यांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसArrestअटक