मावळमध्ये पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आरोपी अटकेत
By किरण शिंदे | Updated: December 14, 2025 17:41 IST2025-12-14T17:39:38+5:302025-12-14T17:41:21+5:30
या चिमुरडीची आई कामावर जात असल्याने ती अनेकदा घरात एकटीच असायची.

मावळमध्ये पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आरोपी अटकेत
पुणे - पुणे जिल्ह्यातील मावळातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी ही चिमुकली घरातून अचानक बेपत्ता झाली होती. रात्री उशिरा आई कामावरून घरी परतल्यानंतर मुलगी घरी नसल्याचे लक्षात येताच शोधाशोध सुरू झाला. मात्र तरीही मुलगी सापडत नसल्याने पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.
तपास सुरू असतानाच धक्कादायक माहिती समोर आली. घराजवळ राहणाऱ्या समीर मंडळ नावाच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. आणि त्यानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केलं खून केल्याचं निष्पन्न झालं. या चिमुरडीची आई कामावर जात असल्याने ती अनेकदा घरात एकटीच असायची.
याच परिस्थितीचा गैरफायदा घेत घराजवळ राहणाऱ्या समीर मंडळ याने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. आरोपी समीर मंडळ यांनी या चिमुटला घरापासून काही अंतरावर नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करत गळा दाबून खून केल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं.