Pune Crime: डोक्यात दगड घालून तरुणाचा खून, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 09:21 IST2023-11-20T09:20:31+5:302023-11-20T09:21:14+5:30
ही घटना स्वामी नारायण मंदिरापाठीमागील डोंगराखाली घडली आहे...

Pune Crime: डोक्यात दगड घालून तरुणाचा खून, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल
धायरी (पुणे) : सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला आहे. सौरभ रुपेश शिंदे (वय २३, रा. राम मंदिरजवळ, आंबेगाव पठार, कात्रज, पुणे) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील रूपेश नामदेव शिंदे (वय ४९) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना स्वामी नारायण मंदिरापाठीमागील डोंगराखाली घडली आहे.
सौरभ हा आंबेगाव येथील रहिवासी असून कालपासून त्याचा संपर्क होत नव्हता. दरम्यान, नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी एक मृतदेह पडला असल्याची माहिती काही नागरिकांनी नऱ्हे चौकीत दिली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता, सौरभ याच्या डोक्यात जड वस्तू मारून त्याचा खून केल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव हे करीत आहेत.