पुणे - पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच कोथरूड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. केवळ एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या मैत्रीच्या रागातून 23 वर्षीय तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात संताप आणि खळबळ निर्माण झाली आहे. मृत तरुणाचे नाव नागेश संजय जाधव (वय 23) असे असून तो शिवाजीनगर परिसरातील वडारवाडी येथे राहत होता. नागेश हा शिवाजीनगर भागात ऑफिस बॉय म्हणून काम करत होता आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यात आईला मदत करत होता. याबाबत सामोरे आलेल्या माहितीनुसार, 14 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.15 वाजण्याच्या सुमारास नागेशला मोबाईलवर फोन आला. फोन आल्यानंतर तो घरातून मोटरसायकलवरून बाहेर पडला. काही वेळानंतर रात्री सुमारे 8 वाजता नागेशच्या मोबाईलवरूनच त्याच्या आईला फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने शिवीगाळ करत नागेशला कोथरूडमधील मेगासिटी परिसरात मारहाण केल्याचे सांगितले आणि 10 मिनिटांत येऊन तुमचा मुलगा घेऊन जा, नाहीतर खाली फेकून देऊ अशी धमकी दिली. यानंतर नागेशची आई आणि काही नातेवाईक तातडीने कोथरूडमधील मेगासिटी परिसरात पोहोचले. तेव्हा परिसरात मोठी गर्दी जमली होती. नागेशला इमारतीच्या टेरेसवर मारहाण सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. नातेवाईक टेरेसवर पोहोचले असता नागेश गंभीर जखमी अवस्थेत खाली पडलेला होता. त्याचे कपडे फाटलेले होते आणि आजूबाजूला लाकडी दांडके पडलेले होते. काही महिला आणि पुरुष त्याला मारहाण करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
Web Summary : In Pune, a 23-year-old was brutally murdered over a friendship with a minor. The victim, Nagेश Jadhav, was beaten on a terrace. His family received a threatening call. Police have arrested six suspects; investigation ongoing.
Web Summary : पुणे में, एक नाबालिग के साथ दोस्ती के कारण 23 वर्षीय युवक की बेरहमी से हत्या कर दी गई। पीड़ित नागेश जाधव को छत पर पीटा गया। उसके परिवार को धमकी भरा फोन आया। पुलिस ने छह संदिग्धों को गिरफ्तार किया; जांच जारी है।