शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
3
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
4
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
5
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
6
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
7
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
8
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
9
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
10
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
11
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
12
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
13
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
14
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
15
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
16
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
17
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
18
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
19
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
20
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
Daily Top 2Weekly Top 5

मटका किंग नंदू नाईकचा दबदबा संपला; एमपीडीए कायद्याअंतर्गत नागपूर कारागृहात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 14:43 IST

नंदू नाईक अनेक दशकांपासून पुण्यातील मटका आणि जुगार व्यवसायाचा बादशहा होता.

-किरण शिंदे पुणे - पुण्यातील अवैध धंद्यांचा सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदू नाईक ( वय ७ २ )याला अखेर एमपीडीए  कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले आहे. ६३ गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या नाईकवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नंदू नाईकच्या जुगार व्यवसायामुळे अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले होते. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांवर आळा घालण्यासाठी खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवला. १७ मार्च २०२५ रोजी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नाईकला नागपूर कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले. त्यानुसार खडक पोलिसांनी त्याला अटक करून नागपूरला रवाना केले.दरम्यान, शुक्रवार पेठ परिसरात दहशत निर्माण करणारा नंदू नाईक अनेक दशकांपासून पुण्यातील मटका आणि जुगार व्यवसायाचा बादशहा होता. कधी पोलिसांना लाखोंच्या ऑफर देणे, तर कधी दुचाकीसाठीही खास ड्रायव्हर ठेवणे. असे त्याचे किस्से शहरभर गाजत होते. अशात आता  मटका किंगचा दबदबा संपला ? असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.  आधीही सुटला होता… पण यावेळी सुटका कठीण?  यापूर्वीही त्याच्यावर  MCOCA अंतर्गत कारवाई झाली होती, मात्र त्याने न्यायालयातून सुटका करून घेतली होती. यावेळी मात्र MPDA कायद्यांतर्गत स्थानबद्ध केल्याने किमान वर्षभर तरी तो बाहेर येऊ शकणार नाही. पोलिसांच्या या कारवाईनंतर पुण्यातील अवैध जुगार व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसnagpurनागपूरArrestअटकPune Crimeपुणे क्राईम बातम्या