शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Pune: गुढीपाडव्याला जाणार होते नवीन घरात; सासूच्या जाचाला कंटाळून सुनेने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:24 IST

Pune Crime: सासूची येरवडा कारागृहात रवानगी: तणावाची परिस्थिती नीरा पोलीसांनी हाताळली

नीरा: येथील सासूने शारीरिक व मानसिक छळ केल्याने एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नीता सचिन निगडे (वय ३३) असे विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी सासू विजया भगवान निगडे हिला अटक केली असून सासवड न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सासूची आता येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत नीता निगडे यांचे वडील सुभाष शंकर माने रा. श्रीगोंदा (ता.आहिल्यानगर) यांनी जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. विजया निगडे-जगताप ही नीता यांना वेळोवेळी लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे, सतत शिवीगाळ करणे, गरीब असल्याने हिनवणी करणे, मुलगा होत नाही म्हणून घालून पाडून बोलणे, नीताच्या साड्या जाळून टाकणे, नवीन फ्लॅट घेतलाय राहायला जाण्याआधी त्यासाठी माहेरून एक लाख रुपये आण म्हणून तगादा लावणे अशा प्रकारचा शारीरिक व मानसिक त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून नीता यांनी नीरा येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी अधिक तपास करत आहेत. सदर घटना २२ मार्च रोजी घडली होती. २५ मार्च रोजी विजया निगडे हिला पोलिसांनी अटक करून सासवड न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तीला आता येरवडा कारागृहात पाठण्यात आल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.२७) माध्यमांना दिली आहे.पती अन् सासूच्या जाचाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल. 

दरम्यान, नीता यांनी रहत्या घरी गळफास घेतल्यानंतर नीरा व जेजुरी पोलिसांना तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले. माहेरचे लोक नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात व नीरा पोलीस दुरक्षेत्रात आल्यावर प्रचंड संतापले होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता नीरेचे फौजदार सर्जेराव पुजारी, घनशाम चव्हाण, हरिश्चंद्र करे यांनी माहेरच्यांची समजूत काढत कायदेशीर कारवाई करू असे आश्वासीत केले. अंत्यविधी वेळी ही मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

गुढीपाडव्याला जाणार होते नवीन घरात

नीता यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांच्या पतीने नीरा शहरात एक फ्लॅट घेतला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या फ्लॅट मध्ये हे कुटुंब रहावयास जाणार होते. यावरून सासू सुनेला कुरबुर करतं होती. आता पत्नीच्या पश्चात फ्लॅट मध्ये या तीन मुलांचे संगोपन कसे करायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसArrestअटकPune Crimeपुणे क्राईम बातम्याDomestic Violenceघरगुती हिंसा