Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 17:52 IST2025-12-14T17:51:44+5:302025-12-14T17:52:50+5:30
अमरावतीतील तरुणीचे पुण्यातील हवेली तालुक्यातील तरुणासोबत लग्न झाले. पण, सहा महिन्यामध्येच तिला त्रास देणं सुरू झाले. पतीचे दामिनी नावाच्या तरुणीसोबत संबंध असल्याचे तिला कळले. त्यानंतर पतीच्या गर्लफ्रेंडनेच तिला धमक्या देणं सुरू केलं.

Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
Pune Crime News: अमरावती जिल्ह्यात असलेल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील एका ३० वर्षीय तरुणीचे हवेली तालुक्यातील अमोल नावाच्या तरुणासोबत लग्न झाले. सुरूवातीचे सहा महिने तिला चांगली वागणूक मिळाली, पण त्यानंतर पती आणि सासरच्या मंडळींनी खरे रंग दाखवायला सुरूवात केली. काही दिवसांनी पतीचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे विवाहितेला कळले. इतकेच नाही, तर अमोलचे संबंध असलेल्या तरुणीने विवाहितेला थेट धमकीच दिली. या प्रकरणी आता चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील माहेरवाशिण असलेल्या तरूणीचे रीतीरिवाजाप्रमाणे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात राहणाऱ्या अमोल नामक तरुणाशी लग्न झाले. लग्नानंतर सहा महिने सासरच्या मंडळींनी तिला चांगली वागणूक दिली. मात्र त्यानंतर तिला त्रास देणे सुरू झाले.
अमोलचे दामिनीसोबत प्रेमसंबंध
दरम्यान, पती अमोल याचे दामिनी नामक २७ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध असल्याची जाणीव तिला झाली. त्यामुळे तिने पतीला जाब विचारला. त्यावेळी पतीने तिला काहीही न म्हणता उलट पत्नीलाच त्रास देणे सुरू केले.
तुझ्या बायकोला सोडचिठ्ठी दे, अशी मागणी दामिनी नामक ती महिला अमोलकडे करीत होती.
त्यानंतर तिने थेट विवाहितेलाच धमकी दिली. 'अमोलला सोडचिठ्ठी देऊन, तू तुझ्या माहेरी निघून जा, नाही गेली तर तुला पाहून घेईल, अशी धमकी दामिनी हिने दिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
सासू-सासऱ्यांनी आपल्याला तू चांगली नाहीस, तुला बाहेर फिरायला पाहिजे, म्हणून आपल्याशी वाद घातला, असे विवाहितेने म्हटले आहे. ३० वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी १२ डिसेंबर रोजी तिच्या पतीसह त्याच्या प्रेयसीविरुद्ध कौटुंबिक छळाचा गुन्हा नोंदविला.
दोन लाख आण, तरच परत ये
सासरचा तो त्रास असह्य झाल्याने ती माहेरी परतली. तेव्हा पतीने तिला माहेरहून 'दोन लाख रुपये घेऊन येशील, तेव्हाच घरी परत ये. नाहीतर येऊ नकोस', अशी धमकी दिली. दरम्यानच्या काळात तिचा पती सोनगावला आला. 'तुमच्या मुलीला मला वागवायचे नाही, मला सोडचिठ्ठी पाहिजे', असे म्हणून त्याने विवाहितेच्या आईवडिलांना शिवीगाळ केली, असेही फिर्यादीने म्हटले आहे.