-किरण शिंदेपुणे - शहरातील विविध कापड दुकानांतून अंडरगारमेंट्स व इतर गारमेंट्स चोरी करणाऱ्या चोरट्याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणपत मांगीलाल डांगी (वय ४४, रा. विठ्ठलनगर, सिंहगड रोड) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. येरवडा पोलीस ठाण्यात आठ लाख रुपयांच्या लेडीज व जेन्ट्स अंडरगारमेंट्स चोरीप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिकच्या माहितीनुसार, कल्याणीनगरमधील एस एल एन्टरप्रायजेस नावाच्या एका प्रसिद्ध ब्रँडच्या कपड्याच्या दुकानात अंडरगारमेंट्सची चोरी झाल्याची घटना घडली होती. हा चोर कल्याणीनगर भागात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी हालचाली सुरु केल्या.
यावेळी पोलिसांना बघून आरोपी पळून जावू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं. त्याची चौकशी केली. व्यक्ती हा येरवडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मालापैकी 7 लाख 30 हजारांचे लेडीज व जेन्टस अंडरगारमेंट, टि शर्ट, नाईट पॅन्ट जप्त करण्यात आला.
पोलीस चौकशीत त्याचं नाव आणि त्याचा येरवडा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीकडून चोरीला गेलेला ७.३० लाखांचा माल, ज्यामध्ये लेडीज व जेन्ट्स अंडरगारमेंट्स, टी-शर्ट्स, नाईट पॅन्ट्स यांचा समावेश आहे, तो जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.