पुणे विमानतळावर ७४.५० लाखांचे हायड्रोपोनिक गांजा जप्त; एअर इंडियाच्या बँकॉक-पुणे फ्लाइटमध्ये कारवाई

By किरण शिंदे | Updated: March 5, 2026 09:38 IST2026-03-05T09:34:34+5:302026-03-05T09:38:44+5:30

पुणे - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाच्या (एअर इंटेलिजन्स युनिट) अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत सुमारे  ७४.५० लाख रुपये ...

pune crime hydroponic marijuana worth Rs 74.50 lakh seized at Pune airport; action taken on Air India's Bangkok-Pune flight | पुणे विमानतळावर ७४.५० लाखांचे हायड्रोपोनिक गांजा जप्त; एअर इंडियाच्या बँकॉक-पुणे फ्लाइटमध्ये कारवाई

पुणे विमानतळावर ७४.५० लाखांचे हायड्रोपोनिक गांजा जप्त; एअर इंडियाच्या बँकॉक-पुणे फ्लाइटमध्ये कारवाई

पुणे - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाच्या (एअर इंटेलिजन्स युनिट) अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत सुमारे  ७४.५० लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा (मारिजुआना) जप्त केला आहे. ही कारवाई मार्च २०२६ रोजी करण्यात आली.

अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बँकॉकहून पुण्याकडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-241 या विमानाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विमानातील लॅव्हेटरीतील टिश्यू कॅबिनेटमध्ये दोन पिवळ्या रंगाचे फूड पॅकेट आढळून आले.

ही पॅकेट उघडून पाहिली असता त्यामध्ये एकूण ८ व्हॅक्युम सीलबंद पॅकेटमध्ये ७४५ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा सापडला. आंतरराष्ट्रीय अवैध बाजारात या अमली पदार्थाची किंमत सुमारे ७४.५० लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सदर अमली पदार्थ एनडीपीएस (NDPS) कायदा १९८५ अंतर्गत जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून हा माल कोणाकडून आणला गेला आणि कोणासाठी ठेवण्यात आला होता याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title : पुणे हवाई अड्डे: बैंकॉक की उड़ान से 74.5 लाख का हाइड्रोपोनिक गांजा जब्त

Web Summary : पुणे हवाई अड्डे पर बैंकॉक से आई एयर इंडिया की उड़ान से 74.5 लाख रुपये का हाइड्रोपोनिक गांजा जब्त किया गया। ऊतक कैबिनेट में छिपाए गए ड्रग्स तलाशी के दौरान पाए गए। मूल और गंतव्य निर्धारित करने के लिए जांच चल रही है।

Web Title : Pune Airport: Hydroponic Marijuana Worth ₹74.5 Lakh Seized from Flight

Web Summary : Pune airport authorities seized ₹74.5 lakh worth of hydroponic marijuana from an Air India flight from Bangkok. The drugs, concealed in tissue cabinets, were discovered during a search. An investigation is underway to determine the origin and destination.