Video : माझ्या पोटच्या गोविंदाचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आंदेकरला निवडणुकीचं तिकीट देऊ नका
By किरण शिंदे | Updated: December 23, 2025 09:50 IST2025-12-23T09:47:13+5:302025-12-23T09:50:24+5:30
आयुष कुमकर तोच आहे ज्याची टोळी युद्धातून पुण्यात हत्या झाली. आंबेकर टोळीच्या गुंडांनी जवळपास नऊ ते दहा गोळ्या झाडून त्याला अतिशय निर्घृणपणे संपवलं. आयुष फक्त 19 वर्षाचा होता.

Video : माझ्या पोटच्या गोविंदाचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आंदेकरला निवडणुकीचं तिकीट देऊ नका
पुणे - जर आम्हाला न्याय देता येत नसेल तर अन्याय नका करू. आंदेकरांना निवडणुकीचे तिकीट देऊ नका. कारण माझ्या एवढ्या लहान मुलाचं आयुष्य त्याने उध्वस्त केलं. त्यांच्याकडे सत्ता होती म्हणून आजवर त्यांनी इतकं केलं. त्यामुळे आता असं करू नका. त्यांना तिकीट देऊ नका. मी विनंती करते. जो पक्ष त्यांना तिकीट देईन त्यांच्या पक्ष कार्यालयासमोर जाऊन मी आत्मदहन करेल. माझ्या गोविंदाला न्याय द्या. मला एवढेच पाहिजे. ही कळकळीची विनंती आहे आयुष कोमकर त्याची आई संजीवनी कोमकर यांची.
होय, आयुष कुमकर तोच आहे ज्याची टोळी युद्धातून पुण्यात हत्या झाली. आंबेकर टोळीच्या गुंडांनी जवळपास नऊ ते दहा गोळ्या झाडून त्याला अतिशय निर्घृणपणे संपवलं. आयुष फक्त 19 वर्षाचा होता. क्लासेस वरून तो घरी आला होता.. पार्किंग मध्ये गाडी लावून घरात जात असतानाच मागावर असलेल्या गुंडांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.. पोलीस तपासात हा संपूर्ण प्रकार आंदेकर टोळीनं केल्याचं समोर आलं.. मुलगा वणराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांनाच ही हत्या घडवून आणल्याचं समोर आलं.. आणि त्यानंतर सूर्यकांत आंदेकर यांच्यासह आंबेकर टोळीच्या कुटुंबातील आणि घरातील अनेक सदस्य सध्या तुरुंगात बंद आहेत..
मात्र आता हेच आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.. आंदेकर कुटुंबातील दोन सदस्य निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता नाना पेठ परिसरात व्यक्त केली जात आहे.. वनराज आंदेकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नगरसेवक होता.. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कडून ते निवडणूक लढवतील अशी देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.. मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस तिकीट देईल का हा देखील प्रश्न आहे.. त्यापूर्वीच आयुष कोमकर याची आई संजीवनी कुमकर यांनी राजकीय पक्षांना विनंती केली.. आंदेकरला तिकीट देऊ नका अन्यथा ज्या पक्षाने तिकीट दिले त्या पक्षाच्या कार्यालयासमोर येऊन मी आत्मदहन करेल असा इशाराही संजीवनी कोमकर यांनी दिला आहे..
खरंतर आंदेकर टोळी निस्तनाबूत करण्यासाठी पुणे पोलिसांनी पाऊल उचलली आहेत.. नाना पेठेतील आंदेकराचा साम्राज्य उध्वस्त करण्यात आलं.. ज्या अनधिकृत कामाच्या जोरावर आंदेकर टोळीने वारेमाप पैसा कमावला होता ती सर्व अनधिकृत काम उध्वस्त करण्यात आली.. त्याच्या टोळीच्या गुंडांना तुरुंगात टाकण्यात आलं.. मात्र तरीही आंदेकर तुरुंगातून निवडणूक लढवू शकतो अशी चर्चा सुरू झाली.. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...