शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठाची दहा कोटींची फसवणूक करणारे सायबर चोरटे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 10:46 IST

- 'डिजिटल अरेस्ट'ची दिली होती धमकी : सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी

पुणे : डिजिटल अरेस्टची भीती दाखवून शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाची पावणे अकरा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली. हर्षद सुभाष धनतोले (वय २३), समर्थ सुरेश देशमुख (वय २४, दोघे सध्या रा. कर्वेनगर, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

आरोपी धनतोले, देशमुख यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल नंबरवर संपर्क साधून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील (सीबीआय) अधिकारी असल्याची बतावणी केली होती. ब्लॅक मनी व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, या प्रकरणात सीबीआयकडून अटक (डिजिटल अरेस्ट) करण्यात येणार असल्याची भीती दाखवण्यात आली होती.

या प्रकरणात कुटुंबीयांनाही अटक करण्यात येणार असल्याचे सांगून आरोपींनी ज्येष्ठ नागरिक आणि त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात रक्कम जमा करावी, असे सांगितले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या खात्यात दहा कोटी ७४ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

सीसीटीव्ही फुटेज तपासलेत्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. ज्येष्ठ नागरिकाने ज्या बँक खात्यात पैसे भरले होते. त्या खात्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली, तसेच चोरट्यांनी शहरातील काही एटीएममधून पैसे काढले होते. पोलिसांनी संबंधित एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सायबर पोलिसंच्या पथकाने तपास करून आरोपी धनतोले अणि देशमुख यांना अटक केली. त्यांच्याकडून चार लाख ७८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.४० लाख गोठवलीआरोपींच्या खात्यातील ४० लाख रुपयांची रक्कम गोठवली आहे. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलिस निरीक्षक संगीता देवकाते, सहायक निरीक्षक अर्चना कटके, उपनिरीक्षक सुशील डमरे, अजित बढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Cyber Thieves Arrested for Swindling Senior Citizen of Millions

Web Summary : Cyber police arrested two individuals for defrauding a senior citizen of over ₹10 million through digital arrest tactics. The accused impersonated CBI officers, threatening arrest and demanding money, which led to their capture and the recovery of some funds.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या