मंचर : मंचर पोलिस ठाण्यात एसटीच्या चालक, वाहक तसेच प्रवाशांना मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे प्रदीप दत्तात्रेय माशेरे आणि सिद्धेश दत्तात्रेय माशेरे (दोघे रा. मंचर) अशी आहेत.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परेल एसटी आगाराचे चालक भरत पांडुरंग बुगदे यांनी फिर्याद दिली आहे की, मंचर एसटी बस स्थानकात प्रदीप दत्तात्रेय माशेरे व सिद्धेश दत्तात्रेय माशेरे यांनी एसटीचे चालक भरत बुगदे, वाहक अमित अरुण करपे आणि बसमधील एका प्रवाशाला मारहाण केली.
अवसरी फाटा येथे थार गाड्याच्या चालकाबरोबर भांडणे का केली यावरून माशेरे बंधूंनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. त्यानंतर एसटी बस नेहमीप्रमाणे चालवायची नाही म्हणून बस थांबवून ठेवून सरकारी कामात अडथळा आणला. एसटी चालक भरत बुगदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रदीप दत्तात्रेय माशेरे व सिद्धेश दत्तात्रेय माशेरे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक फौजदार कीरवे करत आहेत.
Web Summary : Two men, Pradeep and Siddhesh Mashere, have been booked for assaulting an ST bus driver, conductor, and a passenger at the Manchar bus stand. The assault stemmed from a dispute, and the accused also obstructed official duties by stopping the bus.
Web Summary : मंचर बस स्टैंड पर एसटी बस ड्राइवर, कंडक्टर और एक यात्री पर हमला करने के आरोप में प्रदीप और सिद्धेश माशेरे नामक दो लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। हमला एक विवाद के कारण हुआ, और आरोपियों ने बस को रोककर सरकारी काम में भी बाधा डाली।