बोपदेव घाट अत्याचार प्रकरण : येत्या ८ एप्रिल रोजी आरोपींविरोधात दोषारोप निश्चितीचा मसुदा सादर होणार
By नम्रता फडणीस | Updated: March 20, 2025 21:20 IST2025-03-20T21:20:05+5:302025-03-20T21:20:44+5:30
मित्राबरोबर बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना रात्री घडली

बोपदेव घाट अत्याचार प्रकरण : येत्या ८ एप्रिल रोजी आरोपींविरोधात दोषारोप निश्चितीचा मसुदा सादर होणार
पुणे : बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील दोन आरोपींविरोधात येत्या ८ एप्रिल रोजी विशेष सरकारी वकील उज्वला पवार यांच्याकडून दोषारोप निश्चितीचा मसुदा न्यायालयात सादर केला जाणार आहे.
बोपदेव घाटातील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शोएब अख्तर ऊर्फ शोएब बाबू शेख (वय २७)व चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय 20) या दोन आरोपींना पीडिता व घटनेच्या दिवशी जखमी झालेल्या तिच्या मित्राने ओळखले. येरवडा मध्यवर्ती कारागृहात घेण्यात आलेल्या चाचणी ओळख परेड दरम्यान आरोपींची ओळख स्पष्ट झाल्यांनतर पोलिसांनी वानवडी येथील लष्कर न्यायालयात आरोपींविरोधात पाचशे पानी दोषारोपपत्र दाखल केले . दरम्यान, या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वला पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर सुरु करावी असे शासनाकडून त्यांना सांगण्यात आले आहे. या प्रकरणात अद्याप एक आरोपी फरार असून, दोन आरोपींविरोधात दोषारोप निश्चितीचा मसुदा विशेष सरकारी वकील उज्वला पवार सादर करणार आहेत.
दि. 3 ऑक्टोबर रोजी मित्राबरोबर बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना रात्री घडली होती. पोलिसांनी पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे.