शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

'लग्नापूर्वी म्हणाले काही नको, नंतर...'; पत्नीची इमारतीवरून उडी,आय टी इंजिनिअर पतीवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 19:00 IST

“तुम्ही फक्त कन्यादान करा, बाकी आम्हाला काही नको,” असे सांगून लग्न ठरवणाऱ्या आयटी इंजिनिअर पतीसह त्याच्या कुटुंबीयांनी लग्नानंतर हुंड्याच्या मागण्यांसाठी मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.

पुणे - वैष्णवी हगवणे प्रकरणाची आठवण अजून ताजी असतानाच पुण्यात आणखी एका नवविवाहितेचा हुंड्याच्या छळामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “तुम्ही फक्त कन्यादान करा, बाकी आम्हाला काही नको,” असे सांगून लग्न ठरवणाऱ्या आयटी इंजिनिअर पतीसह त्याच्या कुटुंबीयांनी लग्नानंतर हुंड्याच्या मागण्यांसाठी मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.

या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत विवाहितेचे नाव गंगा तेजस बेंबळकर (२७) असून ती बाणेर येथील पिओनी सोसायटीत राहत होती. तिचे वडील शरणकुमार मल्लिकार्जुन माशाळ (५९) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आयटी इंजिनिअर पती तेजस बेंबळकर, त्याची आई उज्ज्वला, वडील शिवा आणि बहीण रिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब झरेकर करत आहेत.तक्रारीनुसार, कलबुर्गी येथील महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या फिर्यादींच्या मुलीचा विवाह नोव्हेंबर २०२५ मध्ये झाला. मुलाकडील मंडळींनी सुरुवातीला कोणतीही मागणी नसल्याचे सांगितले. मात्र साखरपुड्यानंतर महागडे मंगल कार्यालय, हॉटेल आणि पाहुण्यांच्या सोयीसाठी खर्च करण्याचा दबाव टाकण्यात आला. मुलीच्या सुखासाठी वडिलांनी स्वतःचा प्लॉट विकून लाखो रुपये खर्च केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तरीही मुलाकडील मंडळींनी लग्नात दिलेल्या आहेरावर नाराजी व्यक्त करत वारंवार अपमान केल्याचा आरोप आहे.लग्नानंतर आठवडाभरातच गंगाने वडिलांना हुंड्याच्या कारणावरून छळ होत असल्याचे सांगितले होते. सोलापूर येथे नातेवाईकांच्या लग्नात भेट झाली तेव्हाही तिने आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. मैत्रिणीलाही फोनवर ती त्रासाबद्दल सांगत होती.  १९ फेब्रुवारीच्या रात्री गंगाने राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Newlywed Commits Suicide Due to Dowry Harassment; Husband Arrested.

Web Summary : A Pune newlywed, Ganga Benbalkar, committed suicide after alleged dowry harassment by her IT engineer husband and his family. The family initially denied dowry demands but later pressured her family, leading to her tragic death. Police have filed charges.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या