पुणे - गेल्या काही दिवसांपासून कोथरूड पोलीस स्टेशन सातत्याने चर्चेत आहे. परिसरात वारंवार घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे. परंतु, इतक्या गंभीर घटनांनंतरही कोथरूड पोलीस स्टेशनकडून ठोस कारवाई दिसून येत नाही, हे नागरिकांमध्ये संतापाचं कारण ठरत आहे.सुरुवातीला गजा मारणे याच्या गुंडांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर कुख्यात निलेश घायवळ टोळीने थेट सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करत गोळीबाराची घटना घडवली. आता याच मालिकेत आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका तरुणाने हातात बंदूक घेऊन सोसायटीत प्रवेश केला आहे. या घटनांमुळे कोथरूड परिसर गुंडगिरीच्या छायेखाली असल्याचं स्पष्ट होत आहे. या घटनांच्या मालिकेनंतर नागरिक एकच प्रश्न विचारत आहेत की, कोथरूड पोलिस नेमके करतात काय? परिसरातील गुंडांना आता पोलिसांचं अजिबात भय उरलं नसल्याचं हे प्रकार दाखवून देत आहेत.
Web Summary : Kothrud faces rising crime, including assaults and shootings, sparking public outrage. Despite Commissioner Kumar's reputation for strictness, inaction raises questions about favoritism towards Kothrud's senior inspector. Citizens demand investigation and improved safety.
Web Summary : कोथरूड में हिंसा और गोलीबारी सहित अपराध बढ़ रहा है, जिससे जनता में आक्रोश है। आयुक्त कुमार की सख्ती की प्रतिष्ठा के बावजूद, निष्क्रियता कोथरूड के वरिष्ठ निरीक्षक के प्रति पक्षपात के बारे में सवाल उठाती है। नागरिक जांच और बेहतर सुरक्षा की मांग करते हैं।