शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Ayush Komkar : आरोपींच्या बँक खात्यातून आणखी ५० लाख जप्त; पोलिसांचा तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 20:26 IST

पोलिसांकडून आंदेकर टोळीच्या सर्व सदस्यांच्या मालमत्तेची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास सुरु करण्यात आला

पुणे: नाना पेठेतील आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरच्या घरावर काही दिवसांपूर्वी छापा टाकल्यानंतर आता पोलिसांनी इतर आरोपींच्या बँक खात्यांवरही कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ५० लाख रुपये जप्त करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण २७ बँक खाती फ्रीज करण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये  तब्बल ५० लाख ६६ हजार १९९ रुपये गोठवले गेले आहेत.दरम्यान, पोलिसांकडून आंदेकर टोळीच्या सर्व सदस्यांच्या मालमत्तेची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास सुरु करण्यात आला आहे. यापूर्वी १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता सुरू झालेली आणि ११ सप्टेंबरला पहाटे ४ वाजेपर्यंत चाललेली बंडू आंदेकरच्या घराची झडती मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. या झडतीत पोलिसांच्या हाती ७७० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ८५ लाख रुपये), ३१ हजारांची चांदी, २ लाख ४५ हजारांची रोकड, तसेच विविध कागदपत्रे मिळाली. यावेळी गुन्हे शाखा आणि समर्थ पोलिस ठाण्याचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, बंडू आंदेकरने घराच्या आसपास तब्बल २५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याचे पोलिस तपासात समोर आले. ५ सप्टेंबर रोजी बंडू आंदेकरचा नातू आयुष कोमकर (कल्याणी आंदेकरचा मुलगा) याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या खुनानंतर पोलिसांनी बंडू आंदेकरसह त्याच्या टोळीतील सर्व आरोपींना अटक करण्यात आली.तपासाचा भाग म्हणून बुधवारी पोलिसांनी बंडू आंदेकर, अमन पठाण, यश पाटील आणि वाडेकर कुटुंबीय (वृंदावनी, स्वराज व तुषार) यांच्या घरांची झडती घेतली. या झडतीत २१ हजारांची रोकड, १६ मोबाईल, दागिन्यांच्या पावत्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली. पोलिस तपासामुळे आंदेकर टोळीच्या बेकायदेशीर संपत्तीचे जाळे उघडकीस येत असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPune Crimeपुणे क्राईम बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी