शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये..'हुंड्यासाठी तरुणीचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:29 IST

याप्रकरणी पती, सासू, सासऱ्यांसह सहाजणांविरोधात चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला

पुणे : हुंड्यासाठी तरुणीचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. याप्रकरणी पती, सासू, सासऱ्यांसह सहाजणांविरोधात चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका २४ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती प्रणिल निकुडे (३२), सासरे उदय (६०), सासू वैशाली (५५), दीर प्रतीक (३०, सर्व रा. वडगाव शेरी), चुलत दीर प्रमोद, चुलत सासरे माणिक (रा. कल्याणीनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीचा आरोपी प्रणिल निकुडे याच्याशी ऑक्टोबर २०२३ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर हुंड्यात काही वस्तू दिल्या नाही. आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये, असे पती प्रणिलने तिला सांगितले. त्यानंतर पती प्रणिल, सासरे, उदय, सासू वैशाली, दीर प्रतीक, प्रमोद, चुलत सासरे माणिक यांनी तिला टोमणे मारून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला.

त्यानंतर २५ जून रोजी तरुणीला पती प्रणिलने मारहाण केली. त्याने तिचा गळा दाबला तसेच तिचा मोबाइल संच फोडला. तरुणीला फरफटत सदनिकेच्या गॅलरीत नेले. तिला तेथून ढकलून देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून तक्रार दिल्यास जिवे मारू, अशी धमकी सासरे उदय यांनी दिली, असे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक स्वाती खेडकर पुढील तपास करत आहेत.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर शहर परिसरात विवाहितांचा छळ केल्याच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. कात्रजमधील आंबेगाव परिसरात पतीच्या छळामुळे एका महिलेने सहा वर्षांच्या मुलासह पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना नुकतीच घडली होती.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या