राजगड : राजगड तालुक्यातील सुरवड येथे २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती लक्ष्मण रामभाऊ यादव (वय ६०) यांनी पोलिसांना दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश बाजीराव साबळे (वय २३, रा. सुरवड, ता. वेल्हे, जि. पुणे) याने आत्महत्या केली. ११ जानेवारी रोजी नीलेशच्या वडिलांनी आत्याचा मुलगा हरिभाऊ यादव यांना फोन करून नीलेश काय करीत आहे ते पाहण्यास सांगितले. त्यानंतर हरिभाऊ यादव यांनी नीलेशच्या घरी जाऊन पाहणी केली असता, नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने घराच्या छताला गळफास घेतल्याचे आढळून आले.या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची नोंद करून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मांडके करीत आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
Web Summary : A 23-year-old man in Rajgad, Pune, was found dead by suicide. Nilesh Sable was discovered hanging at his home. The reason for the suicide is currently unknown. Police are investigating the case.
Web Summary : पुणे के राजगढ़ में 23 वर्षीय युवक ने आत्महत्या कर ली। नीलेश साबले अपने घर में फांसी पर लटका हुआ पाया गया। आत्महत्या का कारण अभी तक अज्ञात है। पुलिस मामले की जांच कर रही है।