शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील गुन्हेगारीचे सत्र सुरूच; कात्रजमध्ये जागेच्या वादातून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 15:02 IST

आंबेगाव पोलिस स्टेशन हद्दीत सराईत गुन्हेगारांकडून तरुणाचा खून 

धनकवडी : पुण्यातील चंदनगर परिसरात एका तरूणाच्या डोक्यात फरशी घालून संपवल्याची संतापजनक घटना ताजी असतानाच आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीत संतोषनगर परिसरात रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास जागेच्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली., शुभम सुभाष चव्हाण (वय २६ वर्ष) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अमोल चव्हाण यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटेच्या सुमारास शुभम संतोषनगर भागातून निघाला होता. ओम साई मित्र मंडळ परिसरात आरोपी अमर आणि त्याच्या बरोबर असलेल्या साथीदारांनी त्याला अडविले. आरोपींनी त्याला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींच्या तावडीतून वाचण्यासाठी शुभम तेथून पळाला. आरोपींनी त्याचा पाठलाग केला. त्याला बांबू आणि दांडक्याने बेदम मारहाण केली. यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. दरम्यान शुभम सोबत असलेल्या मित्रांनी शुभम च्या घरी माहिती दिल्यानंतर घरच्यांनी पोलिसांना खबर दिली. अमोल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी तीन आरोपींविरोधात आंबेगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली तसेच पोलीसांकडून आरोपी मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. शुभमच्या घराशेजारी असलेल्या जागेवरुन शुभम आणि अमर यांच्या मध्ये वाद होते. या वादातून हा खून झाला असल्याचे सांगितले जात आहे. अमर वर २०१० मध्ये बॉडी ऑफेन्सचा गुन्हा दाखल आहे. आरोपींच्या शोधार्थ पाच पथके रवाना करण्यात आली आहेत. खूनासाठी बांबू आणि दांडक्याचा वापर केला गेला आहे.

टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक