एनआयएच्या अर्जावर सुनावणीचा अधिकार पुणे न्यायालयाला नाही; बचाव पक्षाचा युक्तिवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:25 IST2020-02-07T04:25:21+5:302020-02-07T06:25:47+5:30
आज पुन्हा होणार सुनावणी

एनआयएच्या अर्जावर सुनावणीचा अधिकार पुणे न्यायालयाला नाही; बचाव पक्षाचा युक्तिवाद
पुणे : कोरगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषदेसंबंधीची कागदपत्रे सुपुर्द करावीत आणि या प्रकरणाची सुनावणी मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयात करावी, यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुणेन्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर निर्णय देण्याचे अधिकार विशेष न्यायालयास नाहीत, असा युक्तिवाद गुरुवारी बचाव पक्षाने केला. या प्रकरणावर शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.
या प्रकरणाचा तपास एनआयएकडे आला आहे. मात्र, पुणे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेले कागदपत्रे व जप्त मुद्देमाल एनआयएला मिळालेला नाही. तपास एनआयए करीत असेल, तर पुढील सुनावणी मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयात व्हावी, अशी मागणी एनआयएचे वकील नामेदव तारलगट्टी यांनी केली.
मात्र एखादे प्रकरण दुसऱ्या जिल्ह्यात वर्ग करायचे असल्यास त्याला उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर तपास एनआयएकडे दिला आहे. मात्र, केंद्राचे एक परिपत्रक आणि एफआयआरमुळे लगेच तपास एनआयएकडे गेला, असे म्हणता येणार नाही, असा युक्तीवाद बचाव पक्षाने केला.