Pune Corona Guidelines : पुणेकरांना दिलासा मिळणार? सोमवारपासून दुकाने सायंकाळी ७ पर्यंत खुली ठेवण्याचा विचार: अजित पवारांचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 02:53 PM2021-07-24T14:53:42+5:302021-07-24T15:50:52+5:30

राज्यात कोरोना लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांच्या बाबतीत निर्बंधात शिथिलता आणण्याचा सरकारचा विचार : अजित पवार

Pune Corona Guidelines : Consolation to the people of Pune! Shops will be open from Monday till 7 pm; Ajit Pawar's hints | Pune Corona Guidelines : पुणेकरांना दिलासा मिळणार? सोमवारपासून दुकाने सायंकाळी ७ पर्यंत खुली ठेवण्याचा विचार: अजित पवारांचे संकेत 

Pune Corona Guidelines : पुणेकरांना दिलासा मिळणार? सोमवारपासून दुकाने सायंकाळी ७ पर्यंत खुली ठेवण्याचा विचार: अजित पवारांचे संकेत 

Next

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात येत्या सोमवारी निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

मार्केट यार्डातील व्यापारी आणि शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी दुकानांची वेळ वाढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे दुकानांची वेळ ७ वाजेपर्यंत वाढवण्याची मागणी आहे. सध्या सोमवार ते शुक्रवार असे सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू आहेत. त्यामुळे वेळ वाढवण्यासंदर्भात मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.

अजित पवार म्हणाले, पुणे शहराचा कोरोनाबाधित दर ३.९ इतका आहे. सध्या निर्बंध हे तिसऱ्या लेव्हलचे आहेत. तिसऱ्या लाटेचा दृष्टीने काम सुरू आहे, जिल्हा प्रशासनाने चांगली काम केले आहेत. शासनाने दुसऱ्या लाटेत झालेली सर्वाधिक रुग्णवाढपेक्षा तिसऱ्या लाटेत दीडपट रुग्ण होण्याचा अंदाज ठेवून बेडचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना काही सवलती देण्याचा विचार सुरू आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना सवलत दिल्याने ज्यांनी लस घेतली नाही ते लस घेण्यास पुढे येतील, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
----
जिल्ह्यात ५५ लाख लोकांचे लसीकरण

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे जिल्ह्याचा लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे. कोविड लसीकरणात ५५ लाखांचा टप्पा पार केला. एका दिवसात एक लाखाहून अधिक लसीकरणही जिल्ह्याने पूर्ण केले आहे. मात्र, लस उपलब्धता त्या तुलनेत कमी असल्याने लसीकरणाला गती देता येत नाही, लस उपलब्धतेसाठी सातत्याने राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत असून अधिकाधिक लसीकरण वाढीचा सातत्याने प्रयत्न आहे.

Read in English

Web Title: Pune Corona Guidelines : Consolation to the people of Pune! Shops will be open from Monday till 7 pm; Ajit Pawar's hints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app