शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील नवीन मिळकती '' टॅक्स '' च्या कक्षेत आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 12:12 IST

महापलिका प्रशासनाने सन २०१९-२० वर्षांसाठीचे तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांचे मिळकत कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

ठळक मुद्देगतवर्षी ५० हजार नवीन मिळकतीतून १९६ कोटींची कर वसुली

पुणे : शहरामध्ये नव्याने पूर्ण झालेल्या मिळकती शंभर टक्के टँक्सच्या कक्षेत आणण्यासाठी यंदा विशेष प्रयत्न करणार आहेत. यासाठी बांधकाम विभागाकडून सर्व भोगवटा पत्रक वाटप केलेल्या मिळकतीची यादी तयार केली आहे. याशिवाय इतर खासगी स्वरुपात गुंठावरीवर बांधलेल्या मिळकतींवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. याबाबत अग्रवाल यांनी सांगितले की, महापलिका प्रशासनाने सन २०१९-२० वर्षांसाठीचे तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांचे मिळकत कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मार्च अखेर जवळ आल्यानंतर अधिकाधिक कर गोळा करण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु याचा फारसा उपयोग होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे यंदा पहिल्या महिन्यांपासूनच शंभर टक्के कर वसुली करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये शहरामध्ये दर वर्षी नव्याने हजारो मिळकती तयार होतात. परंतु यापैकी केवळ ३० ते ४० टक्केच मिळकती टँक्सच्या कक्षेत येतात. परंतु यंदा शंभर टक्के नविन मिळकतींना कर लावण्याचे नियोजन केले आहे. मोठ्या सोसायट्यांना महापालिकेच्या वतीने भोगवटा पत्र दिले जाते. त्यानंतर भोगवटा पत्र दिलेल्या सर्व सोसायट्यांना कर लावला जातात. परंतु खाजगी स्वरुपात गुठावारीमध्ये बांधण्यात आलेल्या मिळकती वर्षानुवर्षे टॅक्सच्या कक्षेत येत नाहीत. तर काही ठिकाणी चार मजली बांधकाम असलेल तर दोन मजल्यासाठीच कर लावून घेतला जातो. अशा सर्व मिळकतींवर यंदा अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.--- महापालिकेच्या वतीने सन २०१८-१९ या अर्थिक वर्षांत सुमारे ५० हजार नवीन मिळकती टँक्सच्या कक्षेत आणल्या. या नवीन मिळकतीमुळे महापालिकेला तब्बल १९६ कोटी रुपयांचा मिळकत कर मिळाला. दर वर्षी सरासरी २० ते २५ हजार मिळकतींना नव्याने कर लावण्यात येतो. परंतु यामध्ये आता वाढ होत असून, यंदा नवीन मिळकतीसाठी अधिक प्रयत्न करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या कर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेTaxकरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका