Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २ हजार २५ नवे कोरोनाबाधित, तर ४ हजार ८२५ रुग्णांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 09:04 PM2021-05-09T21:04:21+5:302021-05-09T21:04:27+5:30

सक्रिय रुग्णांचा आकडा आला ३३ हजार ७३२ वर

In Pune city, 2 thousand 25 new corona-infected and 4 thousand 825 patients were overcome with corona on Sunday | Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २ हजार २५ नवे कोरोनाबाधित, तर ४ हजार ८२५ रुग्णांची कोरोनावर मात

Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २ हजार २५ नवे कोरोनाबाधित, तर ४ हजार ८२५ रुग्णांची कोरोनावर मात

Next
ठळक मुद्देउपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १ हजार ४०१ जणांची प्रकृती चिंताजनक

पुणे: शहरात सलग नवव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून रविवारी दिवसभरात २ हजार ०२५ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात ४ हजार ८२५ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १,४०१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या दोन हजारांनी घटली असून हा आकडा ३३ हजार ७३२ झाला आहे.  

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १,४०१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ६ हजार २६२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ३५८ झाली आहे. पुण्याबाहेरील २४ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ४ हजार ८२५ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ५ हजार ४७४ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ४६ हजार ५६४ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ३३ हजार ७३२ झाली आहे.  

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १३ हजार १०७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २२ लाख ७६ हजार ८८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: In Pune city, 2 thousand 25 new corona-infected and 4 thousand 825 patients were overcome with corona on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app