शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पुणे : गुन्हेगारीचे उगमस्थान नागझरी ; गुंडांच्या जत्रायात्रांचे स्थान : महापालिका, पोलीस उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 5:50 AM

पेशव्यांच्या काळात स्वच्छ पाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागझरी नाला आता गुंडगिरीचे उगमस्थान व नामचिन गुंडांच्या जत्रायात्रांचे स्थान झाले आहे. महापालिका प्रशासनामुळे नाला अस्वच्छ तर झालाच आहे, पण पोलिसांच्या उदासीनतेने तो गुंडांचे आश्रयस्थानही बनला आहे.

पुणे : पेशव्यांच्या काळात स्वच्छ पाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागझरी नाला आता गुंडगिरीचे उगमस्थान व नामचिन गुंडांच्या जत्रायात्रांचे स्थान झाले आहे. महापालिका प्रशासनामुळे नाला अस्वच्छ तर झालाच आहे, पण पोलिसांच्या उदासीनतेने तो गुंडांचे आश्रयस्थानही बनला आहे.गुन्हे करायचे व इथे येऊन रहायचे असा अनेक भुरट्या गुंडांचा खाक्या आहे. पंटर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. गंगाधामपासून महर्षीनगरमार्गे कासेवाडी, तसेच भवानी पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठेत जाणाºया नागझरी नाल्यात गुंडासाठी सुरक्षित असलेले असे अनेक भाग आहेत. त्यापैकीच एका भागात खून करून तीन मृतदेह टाकण्यात आले. त्यामुळे नागझरी नाला चर्चेत आला. शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही एरवी तो गुंड, भुरटे चोर वगळता कोणाच्याही गावी नसतो.गांजेकस, चरसी अशा अमली पदार्थाची नशा करण्यासाठी तर नागझरीचे काही भाग म्हणजे नंदनवन झाले आहेत. ते तिथे बसलेत म्हणून तिथे जायचेच नाही, असे ठरल्यामुळे हे भाग अड्डे म्हणूनच प्रसिद्ध आहेत. काही वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध गुंडाला तिथूनच पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तरी त्यांचे या भागाकडे लक्ष जाऊन ते सुरक्षेची काही व्यवस्था करतील, अशी परिसरातील नागरिकांची अपेक्षा होती, मात्र तसे काहीही झाले नाही. उलट हा सगळाच परिसर गेल्या काही वर्षांत असुरक्षित होत गेला आहे. आता तर तिकडे ना पोलीस फिरकत ना महापालिका कर्मचारी. त्यामुळे गुंडांचाच संचार कायम असतो. त्यावरून सतत भांडणे, मारामाºया सुरू असतात. एकाच वेळी तीन खूनही त्यातूनच पडले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. स्थानिक नगरसेवक अविनाश बागवे यांनी त्यांच्या कासेवाडी परिसरातील नाल्याच्या भागाच्या विकासाचा मुद्दा महापालिकेत मांडला होता. त्यावर स्लॅब टाकून वाहनतळ करावा किंवा दुचाकींसाठी रस्ता करावा, असे त्यांनी सन २००७ मध्ये सुचवले होते. त्यातील वाहनतळ अर्धवट बांधून पडला आहे, तर रस्त्याचा विचारही प्रशासनाने केला नाही. आता अर्धवट बांधलेल्या वाहनतळाच्या खाली उलट चांगली जागा झाली म्हणून व्यवस्थित बैठका वगैरे होत असतात. मॅटर मिटवण्यासाठी म्हणून तिथे कायम गर्दी असते.घसेटी पूल, दारूवाला पूल असे अनेक पूल नागझरी नाल्यावर आहेत. पेशव्यांच्या काळात हा नदीपासून उगम पावलेला ओढा होता. त्याच्या काठाने वसाहती होत्या. नाल्यात उतरण्यासाठी पायºयाही होत्या, असे माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी सांगितले. लहान असताना आपण या पायºया पाहिल्या आहेत, असे ते म्हणाले. कालांतराने लोकसंख्या वाढत गेली, ओढ्याचा नाला झाला व आता तर त्याची गटारगंगाच झाली असल्याचे त्यांनी सांगितले.काठावर वसल्या झोपड्या : गुंडगिरीमध्ये वाढ-१काही नगरसेवकांनी नाल्याचा चांगला उपयोग करून घेतला आहे. गावकोस मारुती येथे माजी नगरसेवक रमेश बोडके यांनी त्यांच्या कारकिर्दीत एक उद्यान तयार केले. त्याचा उपयोग आजही केला जातो. त्यांनीही नाला सुधारणा हा विषयच महापालिकेच्या विषयपत्रिकेवर नसल्याचे स्पष्ट केले. शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक झोपडपट्ट्या या नाल्याच्या काठानेच वसल्या आहेत. वेगवेगळे व्यवसाय चालतात. त्यातील बहुतेक फिटरकाम, अमली पदार्थांची विक्री अशा प्रकारचे आहेत. त्यातूनच गुंडगिरीला प्रोत्साहन मिळत असल्याचे बोडके यांनी सांगितले.२नाल्याचे वेगवेगळ्या पेठांमधले अनेक भाग दिवसा ओकेबोके तर रात्री गजबजलेले असतात. पाऊस जोराचा झाला तरच नाल्यामधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहते. एरवी नाला कोरडाच असतो. त्यामुळेच आता गुंडांच्या आश्रयस्थानांमध्ये वाढ होत चालली आहे. गुंड तयार करणारी फॅक्टरीच इथे तयार होत आहे. पोलिसांना याची माहिती नसते असे नाही, पुर्ण माहिती असते. त्यामुळेच ते बरोबर यायचे तेव्हाच येतात, नेमक्या काही जणांनाच भेटतात व लगेच जातातही, कारवाई काहीच होत नाही. तेच असे पाठीराखे झाल्यामुळे नागझरीच्या नाल्यात गुंडांचे फावले आहे.उद्याने करावीत-नाल्यावर स्लॅब टाकून त्यावर उद्याने करावीत, असा प्रयत्न होता. माझ्या प्रभागात तो मी गावकोस मारुतीजवळ यशस्वी केला. आता स्लॅब कितीतरी स्वस्त झाले आहेत. त्यामुळे आता त्याचा विचार करायला हवा.- रमेश बोडके, माजी नगरसेवकवाहनतळ सुरू करावा-व्यसनी लोकांचा अड्डाच झाला आहे नाल्याचा परिसर. आता झोपडपट्टीमध्येही अनेक दुचाकी वाहने असतात. ती त्यांना घरासमोर लावता येत नाहीत. त्यांच्यासाठी तसेच अन्य नागरिकांसाठी नाल्यावर वाहनतळ सुरू करायला हवा. त्यातून तिथे कायम लक्ष राहील.- अविनाश बागवे, नगरसेवकपोलिसांनी लक्ष द्यावे-पोलिसांनी या भागात सातत्याने लक्ष दिले तर कितीतरी गुन्हे होण्याचे थांबेल, मात्र पोलीस असे करीत नाहीत. महापालिकेतही फक्त नाला सुधारणा, नदी सुधारणा असे प्रस्ताव मांडले जातात, होत काहीच नाही. प्रयत्नपूर्वक यात सुधारणा करणे गरजेचे आहे.- रवींद्र माळवदकर, माजी नगरसेवक

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस