शहरं
Join us  
Trending Stories
1
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
2
Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
3
Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू
4
फक्त ७.१०% च्या व्याजदरावर 'इकडे' मिळतंय होमलोन; ₹८० लाखांच्या कर्जासाठी किती हमी मंथली सॅलरी, EMI किती?
5
गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली
6
घरबसल्या श्रीमंत व्हाल! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा ₹४० लाखांपेक्षा अधिक टॅक्स फ्री रक्कम
7
संसार वाचवण्यासाठी 'ती' सहन करत राहिली, पण नराधम पतीने हद्दच ओलांडली! मारहाण केली अन्...
8
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
10
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
11
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
12
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
13
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
14
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
15
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
16
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
17
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
18
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
19
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
20
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुंभ परिसरात सर्वत्र केमिकल...केमिकल...आणि फक्त केमिकलच..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:44 IST

- डिस्टिलेशन प्लांट कुरकुंभकरांसाठी ठरतायेत जीवघेणे; गावकारभाऱ्यांच्या झाडाझडतीत उद्योजकांची पोलखोल  

- रिजवान मुलाणीकुरकुंभ : औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून उभा केलेल्या उद्योगांनी कुरकुंभ परिसरात मोठ्या आर्थिक घडामोडींची पायाभरणी केली. मात्र, यामुळे निर्माण झालेल्या नागरी समस्यांनी परिसरातील नागरिकांचेच जगणे मुश्कील करून टाकले आहे. रासायनिक कंपन्यांच्या माध्यमातून उत्सर्जित होणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्याने आपला उच्चांक गाठला असून पावसाळ्याच्या दिवसांत कुरकुंभ परिसरात सर्वत्र केमिकल..., केमिकल आणि फक्त केमिकलच आढळून येत आहे.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीनंतर हळूहळू या परिसरात रासायनिक कंपन्यांचे प्रमाण व परिसरातील नागरीकरण वाढू लागले. औद्योगिक परिसर व लोकवस्ती यामधील दरी पूर्णतः संपून गेली. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या कंपन्यांच्या अगदी जवळच लोकवस्ती वाढू लागली, तसेच औद्योगिक क्षेत्रात छोट्या व्यावसायिकांनी देखील आपली घोडदौड मोठ्या प्रमाणात सुरूच ठेवली. मात्र, या सर्व घटनांतून औद्योगिक सुरक्षा, तसेच रासायनिक सांडपाण्याचे प्रश्न दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करू लागले.औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या उत्पादनातून उत्सर्जित होणारा प्राणघातक वायू व रासायनिक घातक सांडपाणी हे उघड्यावर सोडून देण्यात आल्याने याचा प्रादुर्भाव लोकवस्तीत दिसून येत आहे. सध्या कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या अनेक स्मॉल स्केल (छोट्या उद्योगांकडे) घातक रसायनांची विल्हेवाट लावण्यासाठी पूरक यंत्रणा नसल्याने उद्योजक हे घातक पाणी उघड्यावर किंवा कंपनीच्या आतमधील एखाद्या भागात सोडून देतात व पावसाच्या अतिप्रमाणामुळे ते सर्व पाणी लोकवस्तीत येऊन पसरते कुरकुंभ परिसरात या सांडपाण्यामुळे लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून वारंवार तक्रार करून देखील प्रशासकीय यंत्रणेला काहीही फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे.

उद्योजकांची अरेरावी

औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांकडून वापरलेली रसायने घेऊन त्याद्वारे रासायनिक प्रक्रिया करून वेगवेगळे केमिकल वेगळे करण्याच्या व्यवसायाचे सध्या पेव फुटले आहे. कुठल्याही अटी व शर्तींचे पालन न करता उद्योजक रासायनिक प्रक्रियेतून रसायन वेगळे करून उर्वरित घातक रसायने व घातक घनकचरा मोठ्या प्रमाणात उघड्यावर सोडून देत आहेत याबाबत त्यांना जाब विचारला असता अरेरावीची भाषा वापरून तुमची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे करा, असा उलट सल्ला ते ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना देताना दिसून आले. त्यामुळे उद्योजकांची अरेरावी कशा प्रकारे वाढली आहे, हे दिसून येत आहे.

रसायनांचा अनियंत्रित साठा

कुरकुंभ ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी आज पाहणी केलेल्या विविध कंपन्यांमध्ये रसायनांचा अनियंत्रित साठा आढळून आला उत्पादन क्षमतेपेक्षा जास्त रसायनांचा साठा करून ठेवल्याने कंपनीच्या परिसरामध्ये सर्वत्र अस्ताव्यस्त पडलेले ड्रम्स आणि इतर रासायनिक पदार्थ आढळून आले. त्यामुळे एखाद्या आग लागण्याच्या घटनेत आग विझविणाऱ्या कुठल्याही यंत्रणेला आतमध्ये जाता येणे सहज शक्य होत नाही. त्यामुळे आगीचे प्रमाण वाढून अपघाताची व्याप्ती वाढते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड