शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune CBI Raid: ...म्हणून त्या आयएएस अधिकार्‍यावर CBI ची कारवाई

By विवेक भुसे | Updated: June 10, 2023 11:11 IST

या कारवाईत ६ कोटी रुपयांची रोकड तसेच त्याच्या व कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या १४ स्थावर मालमत्तांची कागदपत्रे हस्तगत केली...

पुणे : केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अपर महसूल विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याला ८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यापाठोपाठ त्याच्या शासकीय निवासस्थानाबरोबर खासगी निवासस्थानी छापे घातले. त्यात ६ कोटी रुपयांची रोकड तसेच त्याच्या व कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या १४ स्थावर मालमत्तांची कागदपत्रे हस्तगत केली.

राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या आयएएस अधिकार्‍यावर सीबीआयने कशी काय कारवाई केली, असे प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचे कारण वेगळे आहे. डॉ. अनिल रामोड हा भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहे. त्याची अपर विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती असली तरी त्याच्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रकरणात सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील लवाद म्हणून (आरबीट्रेटर) काम आहे.

राष्ट्रीय महामार्गासाठी लागणार्‍या भू संपादनातील वाद हे त्यांच्याकडे येतात. त्यातून जमीन मालक व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्याप्रमाणे योग्य तो न्यायनिवाडा करण्याचे व जमिनीचा मोबदला ठरविण्याचे काम त्याच्याकडे येते. लवादाचे हे काम केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. त्यात माळशिरस येथील शेतकर्‍यांनी भूसंपादनात अधिक मोबदला मिळावा, म्हणून दाद मागितली होती. त्यात नुकसानभरपाईच्या १० टक्के रक्कमेची मागणी अनिल रामोड याने केली होती.

तक्रारदाराला अंदाजे १ कोटी २५ लाख रुपयांची वाढीव भरपाई देण्यासाठी रामोड याने तक्रारदाराकडे १० लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याची तक्रारदाराने सीबीआयकडे तक्रार केली. शेवटी तडजोड होऊन ८ लाख रुपये लाच घेताना सापळा रचून अनिल रामोडला पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्या घरी घातलेल्या धाडीमध्ये डोळे फाडतील अशी संपत्ती आढळून आली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCBIगुन्हा अन्वेषण विभागPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCorruptionभ्रष्टाचार