कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

By नारायण बडगुजर | Updated: June 15, 2025 23:26 IST2025-06-15T23:09:10+5:302025-06-15T23:26:27+5:30

Pune Bridge Collapse : कुंडमळा पूल दुर्घटनेत पाच वर्षाच्या बालकासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ४७ जण जखमी झाले आहेत.

Pune Bridge Collapse Death toll rises to four; Four people including a five-year-old child die | कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील साकव पूल कोसळून झालेल्या गंभीर दुर्घटनेत मृतांचा आकडा रात्री पावणेअकरापर्यंत चारवर पोहोचला आहे. तर, जखमींची संख्या ५१ झाली आहे.


कुंडमळा दुर्घटनेतील मृतांची नावे चंद्रकांत गुनाजी साठले (४५, रा. वानवडी, हडपसर), रोहित सुधीर माने (३१), विहान रोहित माने (५, दोघे रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड), चेतन आण्णाप्पा चावरे (२३, रा. इंद्रायणी काॅलनी, तळेगाव दाभाडे, मूळ रा. नसलापूर, ता. रायबाग, जि. बेळगाव) अशी आहेत.

पाच वर्षाच्या बालकासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ४७ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवेने अत्यंत वेगाने आणि कार्यक्षमतेने मदतीसाठी धाव घेतली.

'हे' झालेत जखमी
जखमींमध्ये श्रीकांत गरुड, शुभम वाळुंजकर, सुनील कागवाडे, सुमेर कागवाडे, विजय यनकर, कृष्णा गांधी, आर्यन गायसमुद्र, दीपक वीरकर, सिद्धी बोत्रे, ओंकार पेहरे, चंद्रकांत चौगुले, सानवी भाकरे, वर्षा भाकरे, योगेश भंडारे, संजय भोपे, दिव्या भोपे, सिद्धाराम बांदल, समर्थ सिद्धाराम सोलापूरी, शंतनु निगडे, गोपाळ तीवर, वैशाली उपाध्याय, शिल्पा भंडारे, यास्मिन चौधरी, अशोक भेगडे, सुनील कुमार, वैभव उपाध्याय, अंजूम शहा, अमोल घुले, चित्रलेखा गौर, शमिका माने, होराजी आगलावे, इंदोल तावरे, सुरेश पडवळ, मोनाली पडवळ, वेदांती पडवळ, विनीत पडवळ, योगेश पडवळ, रोहन शिंदे प्रथमेश पलालकर, अभिषेक पाटील, शौकत गौर, तेजस देवराय, प्रथमेश देवरे, सौरभ माने, दीपक कांबळे, ओमकार गिरी, प्रकाश काकडे, साहिल शेटे, सलोनी उपाध्याय, लतिका गौड यांचा जखमींमध्ये समावेश आहे.

पूल कोसळल्याची माहिती मिळताच १०८ नियंत्रण कक्षाने जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रियांक जावळे आणि रोहित ढोमसे यांच्या समन्वयाने तात्काळ ७ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या. अरुंद रस्त्यामुळे अडथळे येत असतानाही १०८ कर्मचारी १५–२० मिनिटांत दुर्घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर तळेगाव जनरल हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल, मायमर हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरु आहेत. स्थानिक प्रशासन,  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल,  पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशामक डाळ, केंद्रीय राखीव पोलीस दल, आपदा मित्र, पुणे पीएमआरडी अग्निशामक दल,  शिवदुर्ग संघटना,  वन्यजीव संघटना यांच्यातर्फे मदत करण्यात आली.  

घटनास्थळी पाठवण्यात आलेल्या १०८ रुग्णवाहिकांचे बेस लोकेशन्स:
तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र, वडगाव मावळ ग्रामीण रुग्णालय, उर्से टोल प्लाझा, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, कामशेत प्राथमिक आरोग्य केंद्र, निगडी यमुनानगर प्रसूतिगृह, देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, पवननगर काळे कॉलनी ग्रामीण रुग्णालय आहे. 


१०८ सेवेच्या वैद्यकीय व सहाय्यक कर्मचाऱ्यांची कामगिरी
डॉ. मशमूम, डॉ. किरण राजपूत, डॉ. स्वप्नील माटकर, डॉ. सुखेंशी हारले, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. विजय कदम, रुग्णवाहिका चालक/पायलट: सूर्यकांत, जयदीप माने, रोहित नाईक, अमोल सुरतवाला, श्रीरंग पाडाळे, अनिल आंद्रे या कर्मचाऱ्यांनी दुर्घटनेच्या क्षणीच धैर्याने आणि तत्परतेने रुग्णांवर उपचार करत त्यांचे प्राण वाचवले. प्रशासनाकडून त्यांच्या कार्यक्षमतेचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापनासाठी चोवीस तास मदत कक्ष सुरू
तहसील कार्यालय मावळ येथे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत चोवीस तास मदत कक्ष कार्यरत आहे. नागरिकांनी मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
 हेल्पलाइन क्रमांक: ०२११४–२३५४४०

Web Title: Pune Bridge Collapse Death toll rises to four; Four people including a five-year-old child die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.