Pune Breaking : पुण्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून राहणार बंद; व्यापारी महासंघाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 08:09 PM2021-04-05T20:09:25+5:302021-04-05T20:29:06+5:30

महापालिका आयुक्त विक्रम कुमार व विभागीय आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतल्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय...

Pune Breaking : Shops in Pune will be closed from tomorrow; Decision of the Federation of Traders | Pune Breaking : पुण्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून राहणार बंद; व्यापारी महासंघाचा विरोध

Pune Breaking : पुण्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून राहणार बंद; व्यापारी महासंघाचा विरोध

Next

पुणे : पुणे शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.तसेच दुकानांना सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत मुभा दिली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.या भूमिकेला पुणे व्यापारी महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी ही माहिती दिली आहे.

पुणे व्यापारी महासंघाने सोमवारी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. यादरम्यान व्यापारी महासंघातर्फे पुण्यातील दुकानांना वेळ वाढवून द्यावी अशी विनंती केली होती. मात्र प्रशासनाने आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यामुळे आता उद्यापासून शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. यात अत्यावश्यक सेवेतील दुकानांचा समावेश नसणार आहे. 

रांका म्हणाले, दिवसा शहरात जमावबंदी असली तरी एसटी बसेस, रिक्षा असे सर्व काही सुरळीत सुरू आहे. मात्र, रात्री संचारबंदी लागू केली आहे. नेमकं पुण्यात रात्रीच कोरोना कसा वाढतो यापाठीमागचा निष्कर्ष काही समजत नाही.त्यामुळे आम्ही उद्यापासून दुकाने बंद ठेवणार आहोत.

Web Title: Pune Breaking : Shops in Pune will be closed from tomorrow; Decision of the Federation of Traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.