Pune Breaking: पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडई इमारतीच्या लाकडी भागाला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 01:21 AM2021-06-11T01:21:45+5:302021-06-11T01:29:29+5:30

ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील पूर्व भागातील लाकड़ी भागाला आग लागली.

Pune Breaking: A fire to wooden part of the Mahatma Phule Mandai building in Pune | Pune Breaking: पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडई इमारतीच्या लाकडी भागाला भीषण आग

Pune Breaking: पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडई इमारतीच्या लाकडी भागाला भीषण आग

Next

पुणे: काही दिवसांपूर्वीच मुळशी तालुक्यातील एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी मध्यरात्री ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील पूर्व भागातील लाकडी भागाला आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ३ गाड्या आणि पाण्याचा १ टँकर घटनास्थळी दाखल झाला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. 

अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी सांगितले, "ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील पूर्व भागातील लाकड़ी भागाला आग लागली. अग्निशामन दलाच्या तीन बंबांनी ही आग आटोक्यात आणली कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. आगीचे कारण, इमारतीचे नुकसान किती झाले हे आत्ता लगेच सांगता येणार नाही."

अग्निशामक दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर, मनीष बोंबले, अजीम शेख, यांच्यासह सुरेश पवार, संतोष आरगडे, संदीप थोरात, अक्षय दीक्षित, नरेश पांगरे, रोहित रणपिसे या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Pune Breaking: A fire to wooden part of the Mahatma Phule Mandai building in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.