शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

'जनतेच्या मनातील आमदार..' धंगेकरांच्या रासनेंविरोधातील बॅनरबाजीने महायुतीत धुसफूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 11:17 IST

आज पुण्यात वाढदिवसानिमित्त लावलेल्या फ्लेक्सवर जनतेचा मनातील आमदार अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे.

पुणे - काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करताच, कसबा मतदारसंघात राजकीय वातावरण तापलं आहे. धंगेकर यांच्या समर्थकांनी जनतेच्या मनातील आमदार असा उल्लेख असलेले फ्लेक्स लावत भाजप आमदार हेमंत रासने यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.या प्रकारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला, त्यामुळे शिंदेसेनेचे स्थानिक शिलेदार तर अस्वस्थ झाले आहेतच, पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनाही जाहीर नाराजी व्यक्त करण्यात सुरूवात केली आहे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते काही बोलत असतील तर ते त्यांचे अनुभवातून आलेले मत आहे, असे म्हणत खुद्द उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही नाराज भाजप कार्यकर्त्यांची पाठराखण केली होती.

अशात आज पुण्यात वाढदिवसानिमित्त लावलेल्या फ्लेक्सवर जनतेचा मनातील आमदार अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे. या  फ्लेक्सवर धंगेकर यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे भाजप आमदार हेमंत रासने यांना डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न चर्चेत आला आहे.  तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदार संघात हेमंत रासने यांनी धंगेकरांचा पराभव केला होता. आता शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात अशा प्रकारचे बॅनर लावून हेमंत रासने यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.दरम्यान पुण्यात महायुतीतील हा संघर्ष आगामी निवडणुकीत काय वळण घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Puneपुणेravindra dhangekarरविंद्र धंगेकरMaharashtraमहाराष्ट्रMahayutiमहायुती