शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पुणे - लोणावळा दरम्यान मध्य रेल्वेकडून रविवारी मेगा ब्लॉक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 9:02 PM

पुणे : मेगा ब्लॉकमुळे मुंबई -पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देहा ब्लॉक सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० यावेळेत राहणार आहे. सिग्नल यंत्रणेतील सुधारणेमुळे या मार्गावरील रेल्वे गाड्यांची ये-जा अधिक सुलभपणे होणार आहे.

पुणे : सिग्नल यंत्रणेतील सुधारणांसह इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेकडून रविवारी पुणे ते लोणावळा दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे यादिवशी प्रगती व सिंहगड एक्सप्रेससह काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्या उशिराने धावणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० यावेळेत राहणार आहे. सिग्नल यंत्रणेतील सुधारणेमुळे या मार्गावरील रेल्वे गाड्यांची ये-जा अधिक सुलभपणे होणार आहे. त्यासाठी कामशेत ते तळेगाव दरम्यान असलेल्या आॅटोमॅटिक सिग्नल यंत्रणेत सुधारणा केल्या जाणार आहेत. तसेच ब्लॉकच्या कालावधीत कामशेत व वडगाव दरम्यान असलेल्या पुलाच्या बांधणीसाठीचे आवश्यक काम केले जाईल. त्यामुळे या वेळेत रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार आहे, असे मध्य रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले आहे.मेगा ब्लॉकमुळे मुंबई -पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस, मुंबई-नागरकोईल एक्सप्रेस या गाड्या लोणावळा व कामशेत स्थानकादरम्यान १ तास २५ मिनिटांसाठी थांबविल्या जातील. तर मुंबई-हैद्राबाद एक्सप्रेस ही गाडी १ तास आणि हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसला तब्बल ३ तास २५ मिनिटे थांबविले जाईल. मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेसही पुणे ते देहूरोज दरम्यान २० मिनिटे थांबेल. पुणे स्थानकातून सकाळी ११.४५ वाजता सुटणारी भुसावळ एक्सप्रेस रविवारी दौंड-मनमाड यामार्गे सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.-----------------पुण्याहून सुटणाऱ्या रद्द लोकलच्या वेळा - सकाळी ६.३०, ६.५०, ८.५७,  ९.५५, ११.२० (शिवाजीनगर), दुपारी १२.१५, १, ३, व ३.४०.-----------------लोणावळ््याहून सुटणाºया रद्द लोकलच्या वेळा - सकाळी ६.३०, ७.५०, ८.२०, ९.५७ (तळेगाव), १०.१०, ११.३०, दुपारी २, २.५०, ३.४०, ४.३८ (तळेगाव).

टॅग्स :PuneपुणेlonavalaलोणावळाRailway Passengerरेल्वे प्रवासी