शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
3
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
4
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
5
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
6
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
7
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
8
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
9
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
10
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
11
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
12
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
13
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
14
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
15
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
16
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
17
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
18
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
19
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

Pune: नात्याला काळिमा फासणारी घटना! पोटच्या मुलीवर बाप, काकासह चुलत भावाकडून अत्याचार

By नितीश गोवंडे | Updated: June 23, 2024 17:03 IST

तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच जन्मदात्या बापासह, काका आणि चुलत भावाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर

पुणे : बाप, काका आणि भाऊ या नात्याला काळिमा फासणारी घटना मांजरी परिसरात घडली आहे. एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच जन्मदात्या बापासह, काका आणि चुलत भावाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. जुलै २०२२ ते १० जून २०२४ या कालावधीत या तीन नराधमांनी पीडित चिमुकलीवर अत्याचार केले. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींविरोधात बलात्कारासह अन्य कलमांन्वये हडपसरपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने सततच्या त्रासाला कंटाळून ही घटना शाळेतील शिक्षिकेकडे सांगितली, त्यानंतर संबंधित शिक्षिकेने याबाबत अल्पवयीन मुलांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेला कळवले. संस्थेतील समुपदेशक शुभांगी घरबुडे आणि प्रमोद पाटील यांनी मुलीला घेऊन हडपसर पोलिस ठाण्यात येत तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. हे कुटुंब परप्रांतीय असून कामानिमित्त शहरात वास्तव्यास आहे. पीडित मुलगी तिच्या आई, वडील, काका आणि चुलत भाऊ अशा एकत्र कुटुंबात मांजरी परिसरात राहायला आहे. जुलै २०२२ मध्ये तिच्या चुलत भावाने राहत्या घरामध्ये वरच्या खोलीत तिला एकटे गाठले. तिला ‘चल प्यार करेंगे’ असे म्हणत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला, त्याला पीडितेने नकार दिला असता तिला लोखंडी रॉडचा धाक दाखवला. त्यानंतर पीडितेवर बलात्कार केला. त्रास झाल्यामुळे तिने आरडाओरडा करत स्वतःची कशीबशी सुटका करून घेत पळ काढला. चुलत भावाने पीडितेला ही गोष्ट कोणाला सांगितल्यास ‘ठार मारून टाकीन’ अशी धमकी दिली होती.

त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये एका रात्री पीडित मुलगी घरात झोपली होती. त्यावेळी तिचा काका (चुलता) त्या ठिकाणी आला. तिच्या अंथरूणामध्ये शिरून त्याने तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांनी या मुलीची आई गावी गेलेली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी जबरदस्ती करत पीडितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने वडिलांना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अशा प्रकारे वडील तिला दररोज त्रास देत असल्याचे देखील पीडितेने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिन्ही नराधमांना अटक केली असून, याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बिराजदार करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाMolestationविनयभंगHadapsarहडपसर