राम जन्मला ग सखी राम जन्मला..! आळंदीत श्रीराम जन्मोत्सवानिमित्त हजारो भाविकांकडून पुष्पवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 16:50 IST2025-04-06T16:48:43+5:302025-04-06T16:50:34+5:30

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने परंपरेनुसार चालत आलेली प्रथा जपली जात आहे.

pune alandi Ram was born, my friend Ram was born Thousands of devotees shower flowers on the occasion of Shri Ram's birth anniversary in Alandi | राम जन्मला ग सखी राम जन्मला..! आळंदीत श्रीराम जन्मोत्सवानिमित्त हजारो भाविकांकडून पुष्पवृष्टी

राम जन्मला ग सखी राम जन्मला..! आळंदीत श्रीराम जन्मोत्सवानिमित्त हजारो भाविकांकडून पुष्पवृष्टी

आळंदी : तिर्थक्षेत्र आळंदीत श्रीराम नवमी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर शिंदेशाही उटी साकारण्यात आली. माउलींच्या डोक्यावर शिंदेशाही फेटा, अंगात भरजरी वस्त्र, कंबरेला आकर्षक पितांबर वस्त्र आणि चेहऱ्यावर पिळदार मिशी असा मराठमोळा अवतार अर्थात मराठा साम्राज्याचे महान योध्दा महादजी शिंदे यांचे रुप साकरण्यात आले.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने परंपरेनुसार चालत आलेली प्रथा जपली जात आहे. पुणे येथील शिल्पकार अभिजित धोंडफळे व सहकारी यांनी ही शिंदेशाही उटी साकारली असल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.

दरम्यान रामनवमीचे औचित्य साधून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे पवमान अभिषेक व पुजा झाल्यानंतर दुपारी १२ वाजता हजारो भाविकांनी पुष्पवृष्टी करत जन्मोत्सव साजरा केला. दरम्यान मोझे सरकार यांच्या माध्यमातून ह.भ.प. शरद महाराज बंड यांचे प्रभु श्रीरामाचा जन्मोत्सवाचे किर्तन सेवा संपन्न झाली. तदनंतर राम जन्माचा पाळणा व आरती घेण्यात आली. यावेळी उपस्थित मानकऱ्यांना देवस्थान तर्फे नारळ प्रसाद देण्यात आला.      

मंदिरालगत आवेकर भावे संस्थानच्या प्रभू रामचंद्र पालखीचे आगमन व पुजन झाले. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर भाविकांसाठी शिंदेशाही उटी दर्शन पंखा मंडपातून सुरु झाले. आळंदी व परीसरात विविध ठिकाणी रामनवमी उत्सव साजरा केला करण्यात आला.

Web Title: pune alandi Ram was born, my friend Ram was born Thousands of devotees shower flowers on the occasion of Shri Ram's birth anniversary in Alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.