काय सांगता..! दुबईत १०० प्रवाशांचे लगेज विसरून विमान पुण्यात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:52 IST2025-06-27T12:51:50+5:302025-06-27T12:52:54+5:30
विमान कंपनीकडून २४ तासांत लगेज घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यांनतर प्रवासी घरी निघून गेले.

काय सांगता..! दुबईत १०० प्रवाशांचे लगेज विसरून विमान पुण्यात दाखल
पुणे : दुबईहून पुण्याला येणाऱ्या स्पाइट जेटच्या विमानातील १०० प्रवाशांचे लगेज दुबई विमानतळावरच विसरल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली असून, विमान कंपनीकडून २४ तासांत लगेज घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यांनतर प्रवासी घरी निघून गेले.
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबई-पुणे हे विमान रात्री साडेबाराला पुण्यासाठी उड्डाण करते. ते पुण्यात सकाळी सहाच्या सुमारास पोहोचते. विमान गुरुवारी सकाळी पुणे विमानतळावर पोहोचले. त्यावेळी विमानातील १०० प्रवासी लगेजची वाट पाहत थांबले होते.
बराच वेळ लगेज न आल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता त्यांचे लगेज दुबई विमानतळावरच विसरल्याचे लक्षात आले. प्रवाशांनी विचारणा केल्यानंतर त्यांचे लगेज चोवीस तासांत पोहोचविण्याचे आश्वासन विमान कंपनीने दिले. परंतु या घटनेमुळे विमान प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.