पुणे ते दिल्ली विमानाला ११ तास उशीर;प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 10:32 IST2025-05-28T10:31:49+5:302025-05-28T10:32:43+5:30

पुण्याहून मंगळवारी सकाळी स्पाइट जेटचे एसजी ९३७ हे विमान सकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण करणार होते

Pune Airport Pune to Delhi flight delayed by 11 hours; | पुणे ते दिल्ली विमानाला ११ तास उशीर;प्रवाशांचे हाल

पुणे ते दिल्ली विमानाला ११ तास उशीर;प्रवाशांचे हाल

पुणे : पुण्याहून मंगळवारी दिल्ली जाणाऱ्या स्पाइट जेट विमानाला तब्बल ११ तास ४० मिनिटे उशीर झाला. तर, दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानाला साडेसहा तास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत बसावे लागले.

पुण्याहून मंगळवारी सकाळी स्पाइट जेटचे एसजी ९३७ हे विमान सकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण करणार होते. तांत्रिक कारणांमुळे हे विमान सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यातून उड्डाण झाले. हे विमान दिल्ली येथे रात्री सात वाजून ५० मिनिटांनी पोहोचले.

तसेच दिल्ली येथून सुटणारे एसजी १८५ हे विमान सकाळी सव्वानऊ वाजता पुण्यासाठी उड्डाण करणार होते. पण, ते दुपारी तीन वाजून ५१ मिनिटांनी पुण्यासाठी सुटले. त्यामुळे पुण्याला येणाऱ्या प्रवाशांना दिल्ली विमानतळावर सहा तास ताटकळत थांबावे लागले. तांत्रिक कारणामुळेच विमानाला उशीर झाल्याचे विमान कंपनीकडून प्रवाशांना सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पुणे दिल्ली विमानसेवेला वारंवार उशीर होत आहे. याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

 

Web Title: Pune Airport Pune to Delhi flight delayed by 11 hours;