मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, एक जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 12:50 AM2021-05-12T00:50:56+5:302021-05-12T06:36:56+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र काकडे याने गेल्या 7 मेरोजी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. (CM Uddhav Thackerays wife Rashmi Thackeray)

Pune Airport police arrested one for posting an offensive post on Facebook about CM Uddhav Thackerays wife Rashmi Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, एक जण ताब्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, एक जण ताब्यात

googlenewsNext

पुणे- मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या बद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय 52) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो वडगाव शिंदे, हवेली येथील असून एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा फोटो आक्षेपार्हरित्या मॉर्फ करून, त्यांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Airport police arrested one for posting an offensive post on Facebook about CM Uddhav Thackerays wife Rashmi Thackeray)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र काकडे याने गेल्या 7 मेरोजी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. यानंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. घटनात्मक पदावर असलेल्या आणि प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल, अशी कृती केल्या मुळे त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकडे हा भाजपचा कार्यकर्ता असून त्याचे स्टेशनरीचे दुकान आहे. 

तत्पूर्वी,  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो आक्षेपार्हरित्या मॉर्फ करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक सचिव मोहसीन शेख आणि स्वाभिमानी लोहार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांच्याविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भाजपा सोशल मीडियाचे पुणे शहर संयोजक विनीत वाजपेयी (वय ३८, रा. साठे वस्ती, लोहगाव) यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. 

शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखान -
गेल्या आठवड्यात, सोशल मीडियावरील बनावट अकाउंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी करणे तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल २६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २७ मार्च ते ७ एप्रिल २०२१ दरम्यान हा प्रकार घडला होता. राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत संभाजी वरपे (वय ३४, रा. पिंपळे निलख, पुणे) यांनी फिर्याद दिल्यानुसार याप्रकरणी नोडल सायबर पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर, तो गुन्हा पिंपरी -चिंचवड शहरातील सांगवी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बनावट फेसबुक पेज, फेसबुक अकाउंट, ट्विटर अकाउंट या सोशल मीडियावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह, हिणकस, विकृत, बदनामीकारक लिखाण केले. तसेच सोशल मीडियावरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
 

Read in English

Web Title: Pune Airport police arrested one for posting an offensive post on Facebook about CM Uddhav Thackerays wife Rashmi Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.