शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट; पूर्ण रक्कम न देता तिकीट रद्दचे ५० टक्के रक्कम कट केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 12:31 IST

- ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशातील चंदीगड, लेह, जम्मू, जेसलमेर व इतर विमानतळांवरील नागरी उड्डयन सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आ

पुणे : भारत-पाकिस्तान देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर देशातील काही विमानतळे सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, विमान प्रवाशांना तिकिटाची सर्व रक्कम संबंधित विमान कंपन्यांकडून देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु विमान कंपन्यांकडून प्रवाशांना पूर्ण परतावा न देता तिकीट रद्द फी आकारून उर्वरित पैसे देण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित प्रवाशांकडून ग्राहक आयोगात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशातील चंदीगड, लेह, जम्मू, जेसलमेर व इतर विमानतळांवरील नागरी उड्डयन सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना पर्यायी मार्गाने निश्चित स्थळी जावे लागले. दरम्यान, पुण्यातील एक दाम्पत्य पर्यटनासाठी हिमाचल प्रदेशाला गेले होते. विमान तिकिटासाठी २८ हजार ६१८ रुपये आकारले होते. परंतु तिकीट रद्द केल्यानंतर त्यांना १५ हजार ७९२ रुपये देण्यात आले असून, १२ हजार ८३६ रुपये तिकीट रद्द फी म्हणून कापण्यात आली आहे.

दरम्यान,(दि. ८) रोजी चंदीगड ते पुणे विमानाची तिकीट काढले होते. परंतु (दि. ८) रोजी चंदीगड विमानतळ बंद होते. दरम्यान, या इमर्जन्सी काळात इंडिगो कंपनीने चंदीगड ते पुणे विमान रद्द झाली किंवा रिशड्यूल झाले, याबाबत काही कल्पना दिली नाही. शिवाय प्रवासी विमानतळावर गेल्यावर विमानतळ बंद आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना कॅब बुक करून दिल्लीला यावे लागले. यामुळे दुप्पट खर्च करावा लागला. नंतर तिकीट रद्द केल्यानंतर इंडिगो कंपनीने ५० टक्के कॅन्सलेशन फी आकारली. विमान वाहतूक महासंचालनालयाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून प्रवाशांची लूट करण्यात येत आहे. याबाबत विमान कंपनीला फोन केले असता, संपर्क झाला नाही.

परतीच्या प्रवासात (दि. ८) रोजी चंदीगड ते पुणे असे तिकीट काढण्यात आले होते. परंतु या दिवशी चंदीगड विमानतळ बंद होते. त्यामुळे सुरतमार्गे पुण्याला आलो. विमानाचे तिकीट रद्द केल्यानंतर इंडिगो कंपनीने ५० टक्के कॅन्सलेशन फी आकारली आहे. सरकारने प्रवाशाचे शंभर टक्के परतावा मिळतील, असे सांगितले होते. आता तिकिटाचे पैसे कट करून रिफंड न देता पूर्ण रक्कम देण्यात यावी. अन्यथा ग्राहक आयोगात तक्रार करणार आहे. - डॉ. अभय तांबिले, विमान प्रवासी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड