विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट; पूर्ण रक्कम न देता तिकीट रद्दचे ५० टक्के रक्कम कट केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 12:31 IST2025-05-16T12:30:38+5:302025-05-16T12:31:46+5:30
- ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशातील चंदीगड, लेह, जम्मू, जेसलमेर व इतर विमानतळांवरील नागरी उड्डयन सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आ

विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट; पूर्ण रक्कम न देता तिकीट रद्दचे ५० टक्के रक्कम कट केले
पुणे : भारत-पाकिस्तान देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर देशातील काही विमानतळे सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, विमान प्रवाशांना तिकिटाची सर्व रक्कम संबंधित विमान कंपन्यांकडून देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु विमान कंपन्यांकडून प्रवाशांना पूर्ण परतावा न देता तिकीट रद्द फी आकारून उर्वरित पैसे देण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित प्रवाशांकडून ग्राहक आयोगात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशातील चंदीगड, लेह, जम्मू, जेसलमेर व इतर विमानतळांवरील नागरी उड्डयन सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना पर्यायी मार्गाने निश्चित स्थळी जावे लागले. दरम्यान, पुण्यातील एक दाम्पत्य पर्यटनासाठी हिमाचल प्रदेशाला गेले होते. विमान तिकिटासाठी २८ हजार ६१८ रुपये आकारले होते. परंतु तिकीट रद्द केल्यानंतर त्यांना १५ हजार ७९२ रुपये देण्यात आले असून, १२ हजार ८३६ रुपये तिकीट रद्द फी म्हणून कापण्यात आली आहे.
दरम्यान,(दि. ८) रोजी चंदीगड ते पुणे विमानाची तिकीट काढले होते. परंतु (दि. ८) रोजी चंदीगड विमानतळ बंद होते. दरम्यान, या इमर्जन्सी काळात इंडिगो कंपनीने चंदीगड ते पुणे विमान रद्द झाली किंवा रिशड्यूल झाले, याबाबत काही कल्पना दिली नाही. शिवाय प्रवासी विमानतळावर गेल्यावर विमानतळ बंद आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना कॅब बुक करून दिल्लीला यावे लागले. यामुळे दुप्पट खर्च करावा लागला. नंतर तिकीट रद्द केल्यानंतर इंडिगो कंपनीने ५० टक्के कॅन्सलेशन फी आकारली. विमान वाहतूक महासंचालनालयाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून प्रवाशांची लूट करण्यात येत आहे. याबाबत विमान कंपनीला फोन केले असता, संपर्क झाला नाही.
परतीच्या प्रवासात (दि. ८) रोजी चंदीगड ते पुणे असे तिकीट काढण्यात आले होते. परंतु या दिवशी चंदीगड विमानतळ बंद होते. त्यामुळे सुरतमार्गे पुण्याला आलो. विमानाचे तिकीट रद्द केल्यानंतर इंडिगो कंपनीने ५० टक्के कॅन्सलेशन फी आकारली आहे. सरकारने प्रवाशाचे शंभर टक्के परतावा मिळतील, असे सांगितले होते. आता तिकिटाचे पैसे कट करून रिफंड न देता पूर्ण रक्कम देण्यात यावी. अन्यथा ग्राहक आयोगात तक्रार करणार आहे. - डॉ. अभय तांबिले, विमान प्रवासी