पुणे-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद, विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:51 IST2018-12-25T00:51:03+5:302018-12-25T00:51:12+5:30
पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक पेरणे फाटा येथे १ जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त रस्ता बंद राहील, अशी माहिती लोणी कंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मानकर यांनी दिली.

पुणे-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद, विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त नियोजन
लोणी कंद : पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक पेरणे फाटा येथे १ जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त रस्ता बंद राहील, अशी माहिती लोणी कंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मानकर यांनी दिली.
बंदोबस्ताबाबत अधिक माहिती देताना मानकर म्हणाले, ‘पेरणे फाटा येथे एक जानेवारीला होणाºया विजयरणस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची जिल्हा प्रशासनाने विशेष दखल घेतली आहे. त्या दृष्टिकोनातून तयारी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी करीत आहे. अभिवादन कार्यक्रम शांततेत आणि सुनियोजित पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. पेरणे फाटा, कोरेगाव भीमा परिसरासाठी पाच हजार पोलीस, दीडशे अधिकारी, शंभर सीसीटीव्ही कॅमेरे, अकरा ड्रोन कॅमेरे, पिण्यासाठी शंभर शुद्ध पाण्याचे टँकर, तीनशे फिरती शैौचालये, २३ रुग्णवाहिका, २३ अग्निशमन दलाचे बंब, वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहतूकव्यवस्थेत बदल
एक जानेवारीला नगर बाजूने पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक चाकणमार्गे व नगरमार्ग हडपसर बाजूने येणारी वाहने तळेगाव ढमढेरे, न्हावरा, केडगावमार्गे वळविण्यात आली आहे. तसेच पुण्याहून नगरकडे जाणारी वाहने चंदननगर खराडी येथून हडपसरमार्गे वळविण्यात आली आहेत. ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाºया बांधवांसाठी काही अंतरावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तेथून जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र बसव्यवस्था करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा व पेरणे फाटा येथे रस्त्यालगत भरणारे भाजीबाजार अन्यत्र हलविण्यात आले आहेत.