शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

पुणे-अहिल्यानगर रस्ता बनला मृत्यूचा महामार्ग; वर्षभरात ५३ जणांनी गमावले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:20 IST

तब्बल ७२ अपघात अवजड वाहनांमुळे झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे ५३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

पुणे/वाघोली : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वारंवार घडत असलेल्या अपघातांमुळे हा मार्ग मृत्यूचा महामार्ग बनत असून, वर्षभरात जवळपास २०० लहान-मोठे अपघात झाले आहेत. त्यातील तब्बल ७२ अपघात अवजड वाहनांमुळे झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे ५३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.वाघोली पोलिस ठाण्यासमोरच केसनंद फाट्यावर पुण्याकडून येणाऱ्या बिल्टवेस इंटरप्राईजेस कंपनीच्या (एमएच१२ विएफ ०४३७) या डंपरने फूटपाथवर झोपलेल्या नऊजणांना चिरडले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे, तर सहाजण गंभीर जखमी झाले. जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना सोमवारी रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी घडली. डंपर चालक अपघातावेळी मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला स्वतःच्या पायावरदेखील उभा राहता येत नव्हते, एवढे मद्यप्राशन त्याने केले होते.वैभवी रितेश पवार, वैभव रितेश पवार आणि विशाल विनोद पवार अशी मृतांची नावे आहेत, तर जानकी पवार, रिनिशा पवार, रोशन भोसले, नागेश पवार, दर्शन विराट, आलिशा पवार, अशी जखमींची नावे आहेत. जखमींना ससूनसह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी (दि. २२) रात्रीच ते अमरावती येथून बिगारी व मजुरी कामासाठी आले होते. जवळपास एकाच कुटुंबातील बाराजण फूटपाथवर झोपले होते. पन्नास ते शंभरजण फूटपाथच्या बाजूला झोपड्यात झोपले होते. यामध्ये महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतून हाताला मिळेल ते काम करणारे सर्व मजूर कामगार आहेत, तर काही भंगार गोळा करणारे आहेत.डंपरचालक दारूच्या नशेत असल्याने त्याचे डंपरवरील नियंत्रण सुटले आणि डंपर थेट फूटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावर गेला. केसनंद फाट्यावरील ही दुर्घटना घडल्यानंतर घटनेमध्ये जखमी व मृत्यू झालेल्यांचे नातेवाईक हंबरडा फोडत होते. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी वीरेंद्र परमदासजी भोसले यांनी फिर्याद दिली असून, डंपर चालक गजानन शंकर तोट्रे (वय २६, रा. केसनंद, मूळ रा. नांदेड) याला अटक केली आहे. पुढील तपास वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलिस करीत आहेत. 

अपघातातील चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, त्याच्यात अशी कलमे टाका की तो सुटता कामा नये. यानुसार चालकावर गुन्हा दाखल झाला असून, मालकावरदेखील गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशी घटना घडल्यानंतर राज्य सरकारकडून त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत दिली जाते. जर लहान मूल असेल तर रक्कम वेगळी दिली जाते. मी आजच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतो. जखमींचा संपूर्ण खर्च राज्य सरकारकडून केला जाईल. - अजित पवार, उपमुख्यमंत्रीमध्यरात्रीच्या सुमारास एका डंपर चालकाने दारूच्या नशेत डंपर चालवून नऊजणांना वाघोली परिसरात चिरडले. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, सहाजण गंभीर जखमी आहेत. या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीला आम्ही अटक केली आहे.- मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्तवाघोली आणि परिसरात अनेक वर्षांपासून अपघातांची मालिका सुरू असून, वर्षभरात या अपघातात ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला जबाबदार कोण ? लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही याचा जाब विचारणार असून, येणाऱ्या काळात या विरोधात मोठे जनआंदोलन उभारू- माऊली कटके, आमदार, शिरूर हवेली. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकPoliceपोलिसwagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीस