शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या धडकेत अप्पर सचिवांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 10:20 IST

पुण्यातील हडपसर परिसरात रविवारी रात्री झालेल्या अपघातात मंत्रालयातील अप्पर सचिव सुहास रामराव चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देपुण्यातील हडपसर परिसरात रविवारी रात्री झालेल्या अपघातात मंत्रालयातील अप्पर सचिव सुहास रामराव चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे.दुचाकीवरुन जात असताना एका वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात समोरून आलेल्या बसने त्यांना धडक दिली. अपघात फुरसुंगी मंतरवाडी येथील किर्लाेस्कर कंपनीजवळ रविवारी (3 मार्च) रात्री पावणे नऊ वाजता घडला. 

पुणे - पुण्यातील हडपसर परिसरात रविवारी रात्री झालेल्या अपघातात मंत्रालयातील अप्पर सचिव सुहास रामराव चव्हाण (वय ४९, रा़ टिळकनगर, चेंबूर) यांचा मृत्यू झाला आहे.

दुचाकीवरुन जात असताना एका वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात समोरून आलेल्या बसने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात फुरसुंगी मंतरवाडी येथील किर्लाेस्कर कंपनीजवळ रविवारी (3 मार्च) रात्री पावणे नऊ वाजता घडला. 

सुहास चव्हाण हे मंत्रालयात अप्पर सचिव म्हणून काम करत होते. त्यांचे भाऊ हडपसर येथे राहतात. चव्हाण हे कात्रजवरुन भावाकडे जात होते. मंतरवाडी येथे एका वाहनाला चुकवून पुढे जात असताना अचानक समोरुन आलेल्या बसने त्यांना धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्यात गंभीर जखम झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांना 108 रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एच टी कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक खोपडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. अपघातानंतर बसचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला असून हडपसर पोलिसांनी आशयर बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह ससून रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. सुहास चव्हाण हे मंत्रालयात लोकप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांना दोन वर्षांपूर्वीच बढती मिळाली होती.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यू