शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

pune accident: भीषण अपघातामुळे यवत गावावर शोककळा; सर्व बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 1:04 PM

यवत येथील काही तरुण रायगड येथे गुरुवारी पर्यटनासाठी गेले होते. तिथून परतत असताना शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात नऊ युवकांचा जागीच मृत्यू झाला..

यवत : पुणे- सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात यवतमधील नऊ युवक जागीच ठार झाल्याने गावावर शोककळा पसरली. अपघाताची बातमी गावात समजताच सकाळपासून  बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. या भीषण अपघातामुळे गावात सर्वत्र सुन्न वातावरण निर्माण झालेले होते. यवत येथील काही तरुण रायगड येथे गुरुवारी पर्यटनासाठी गेले होते. तिथून परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी दुभाजकाला धडक देत विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात नऊ युवकांचा जागीच मृत्यू झाला.

त्यात यवत स्टेशन भागातील विशाल सुभाष यादव , निखिल चंद्रकांत वाबळे , अक्षय चंद्रकांत घिगे , दत्ता गणेश यादव ,स्टेशन रोड परिसरातील सोनू उर्फ नूर महंमद दाया , परवेझ अशपाक आत्तार , महालक्ष्मीनगरमधील अक्षय भारत वाईकर , गावठाण मधील जुबेर अजित मुलानी व कासुर्डी येथील शुभम रामदास भिसे यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बातमी समजताच गावातील अनेक युवक लोणी काळभोर कडे मध्यरात्रीच्या सुमारास रवाना झाले होते.पहाटेच्या सुमारास गावात सर्वत्र अपघाताची बातमी पसरल्या नंतर मृत युवकांच्या घरामसमोर गर्दी जमा होऊ लागली.यातच त्यांच्या घरातील लोकांना सकाळी अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एकच आक्रोश सर्वत्र दिसून येत होता.शनिवार असल्याने सकाळी विद्यालयात जाणा?्या विद्यर्थ्यांची लगबग सकाळी सुरू असताना अपघाताची माहिती मिळताच अनेक विद्यार्थ्यांनी परत घरी जाण्याचा मार्ग पत्करला.गावातील शाळा सुरू झाल्यानंतर मृत युवकांना श्रद्धांजली अर्पण करून शाळांना सुट्टी देण्यात आली होती. भीषण अपघातामुळे गावात सर्वत्र सुन्न वातावरण निर्माण झालेले होते. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस