शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

शिरूर चौफुला महामार्गावर दुभाजकावर ट्रक पलटी; जीवितहानी नाही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:15 IST

- स्थानिकांकडून  दुभाजक काढून त्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

केडगाव (ता. दौंड) : शिरूर चौफुला महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. पुन्हा एकदा ट्रकने दुभाजक ओलांडत थेट पलटी घेतल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहनचालक हैराण झाले आहे.  अधिकच्या माहितीनुसार, पारगाव मोसे बुद्रुक येथे नव्याने तयार होत असलेल्या टोल नाक्याजवळील दुभाजकावर पहाटेच्या सुमारास ट्रक पलटी झाला. समोरून येणाऱ्या वाहनाच्या लाईटमुळे दुभाजक न दिसल्याने हा अपघात घडल्याचे ट्रकचालकाचे म्हणणे आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अपघातानंतर लगेच दोन अन्य गाड्या या पलटी झालेल्या कंटेनरवर आदळल्या. या अपघातात जीवित हानी झाली नाही. या घटनेआधी अवघ्या दोन दिवसांपूर्वी केडगाव उड्डाणपुलाजवळ यात्रेसाठी आलेल्या लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच भागातील मिशन कॉर्नर येथे शाळेच्या बसला ट्रक धडकला होता. सुदैवाने विद्यार्थी आधीच उतरले होते. अशा घटनांमुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.स्थानिक नागरिकांकडून वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून, दुभाजक काढण्याची मागणी जोर धरत आहे. दुभाजक हटवावेत, स्पीड ब्रेकर बसवावेत आणि चांगले फलक लावावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः शाळेजवळ असलेल्या रस्त्यांवर स्पीड ब्रेकरची तातडीने गरज आहे, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर ऋचा बारडकर, अभियंता (शिरूर चौफुला महामार्ग) यांनी सांगितले की, प्रशासनाकडून योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. कंत्राटदारांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. जनजागृतीद्वारे वाहनचालकांना सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही नागरिकांची मुख्य मागणी म्हणजे रस्त्यावरील दुभाजकांची पुनर्रचना, स्पीड ब्रेकरची बसवणी व अपघात टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज. अन्यथा हा महामार्ग 'अपघातमृत्यू महामार्ग' म्हणून ओळखला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPune Crimeपुणे क्राईम बातम्याAccidentअपघातPoliceपोलिस