शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 16:10 IST

अपघात प्रकरणात वडगावशेरी येथील राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी आरोपीला मदत केल्याचा आरोप आहे.

Pune Accident Update ( Marathi News ) :पुणे शहरातील कल्याणी नगर परिसरात झालेल्या अपघातात तरुण-तरुणीला आपला जीव गमवावा लागला. या दोघांना ज्या पोर्शे कारने धडक दिली त्या कारचा चालक असलेल्या तरुणाला तात्काळ जामीन मंजूर झाल्याने पुण्यासह राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय हस्तक्षेपामुळेच आरोपीला लवकर जामीन मिळाल्याचा आरोपही होत आहे. या प्रकरणात वडगावशेरी येथील राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी आरोपीला मदत केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार हेदेखील ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन करत आरोपीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे समजते.

"कोणताही राजकीय हस्तक्षेप न होऊ देता आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करा," अशा सूचना अजित पवारांकडून पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच पोलिसांना याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता अपघाताच्या तीन दिवसांनंतर अजित पवारांकडूनही पोलिसांना सूचना देण्यात आल्याने आगामी काळात आरोपींना खरंच कठोर शिक्षा होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आमदार सुनिल टिंगरे यांनी काय स्पष्टकरण दिलंय?

पुणे अपघातात आरोपीला काही तासांतच जामीन मंजूर झाल्यानंतर पोलीस प्रशासन आणि राजकीय नेत्यांविरोधात सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणात स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांचं नाव येताच त्यांनी याबाबतचा खुलासा केला. ते म्हणाले की, "कल्याणीनगरमध्ये काल रात्री झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. दोन्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण-तरुणीला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल, असा मला विश्वासही आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी आशा बाळगतो. या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना कालपासून सोशल मिडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. याबाबत सुरवातीला दुर्लक्ष केलं परंतु विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात आल्याने कालच्या घटनेबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे."

आपली बाजू मांडताना सुनिल टिंगरे यांनी पुढे म्हटलं आहे की, "माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती काल पहाटे ३ च्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करुन दिली. तसंच माझे परिचित विशाल आगरवाल यांनीही फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं. त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलिस ठाण्यात गेलो. यावेळी पोलिस ठाण्यात चौकशी केली असता पोलिस निरक्षक हे अपघातातील तरुण-तरुणींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचं सांगण्यात आलं. मी त्यांना फोन केला असता १५ मिनिटात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार ते आलेही. पोलिस स्टेशनला आल्यानंतर पीआय साहेबांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानुसार आपण दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना देऊन मी तिथून निघून आलो. मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही हे पोलिस अधिकारीही कबूल करतील, यात शंका नाही. म्हणूनच काल सकाळी ६ वाजता याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियाही झाली. दरम्यान, या अपघातप्रकरणी मी पोलिसांवर दबाव आणल्याचा खोडसाळपणा काही घटकांकडून सोशल मीडियात केला जातोय. यामुळं माझी सार्वजनिक व राजकीय जीवनात बदनामी होण्याची शक्यता असल्याने वस्तुस्थिती याठिकाणी नमूद केली आहे. वास्तविक मी पहिल्यापासून ‘नाईट लाईफ’च्या विरोधात आहे आणि याबाबत वेळोवेळी आवाजही उठवला आहे. विमाननगर, कल्याणीनगर, खराडी या उच्चभ्रू भागात रात्री उशिरापर्यंत अवैधरित्या सुरु असलेले पब, बार आणि टेरेस हॉटेल तसंच दारु विक्री, मटका धंदा, हुक्का पार्लर, पत्त्याचे क्लब, अमली पदार्थांची विक्री, मसाज पार्लर या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत मी पोलिस आयुक्तांना यापूर्वी पत्रही दिलं आहे आणि विधानसभेतही यासंदर्भात आवाज उठवला आहे. तसंच कल्याणीनगरमधील रहिवाशांसोबत पोलिस आयुक्त साहेबांची प्रत्यक्ष भेट घेउनही त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला आहे. शिवाय यापुढेही या अवैध व्यवसायांना माझा नेहमीच विरोध असेल. परंतु एखाद्या अपघाताशी कोणताही संबंध नसताना नाव जोडणं हे चुकीचं आणि बदनामीकारक आहे. सूज्ञ नागरिक या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास आहे," असं आमदार टिंगरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातPoliceपोलिस