Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 09:45 IST2025-09-11T09:38:43+5:302025-09-11T09:45:30+5:30
Pune Accident : पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जण जखमी झाले.

Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
Pune Accident :पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. वाढदिवसानिमित्त आयोजित शोभायात्रेत डीजे वाहनाच्या अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी असल्याची माहिती समोर आली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शोभायात्रेत डीजे वाहनाचा अपघात झाला.
अपघातात ढोलताशा पथकातील आदित्य सुरेश काळे (वय 21) या युवकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना काल बुधवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी आयोजक देवराम लांडे, अमोल लांडे, डीजे मालक सौरभ शेखरे आणि चालक नामदेव रोकडे यांच्यावर जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शोभायात्रेचे आयोजन केले होते. यामध्ये डीजे वाहन, ढोल-ताशा पथक आणि गोफनृत्य पथक सहभागी झाले होते. शोभायात्रा जुन्नर बाजार समितीतून धान्य बाजाराकडे येत असताना उतारावरती असतानाच डीजे वाहन ढोल-ताशा पथकातील युवकांच्या अंगावर आले.
मोठ्या आवाजामुळे वाहन येत असल्याचे समजले नाही. त्यामुळे आदित्य काळे यालाही आवाजामुळे कळले नाही, काही कळण्याआधीच डीजे वाहनाने फरफटत नेले. यामध्ये जखमींमध्ये गोविंद काळे, विजय केदारी, सागर केदारी, बाळू काळे आणि किशोर घोगरे यांचा समावेश आहे.