शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

Pune accident : ते स्टेट्स टाकले आणि गेले ते कायमचेच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 2:50 PM

लोणी काळभोर येथे एर्टीगा कार आणि माल ट्रकच्या भीषण अपघातात यवत मधील नऊ युवकांचा मृत्यू झाला. मात्र या त्यापूर्वी त्यांनी व्हॉट्स ऍपवर लिहिलेले स्टेटस चटका लावून जाणारे आहे.

पुणे (यवत) : लोणी काळभोर येथे एर्टीगा कार आणि माल ट्रकच्या भीषण अपघातात यवत मधील नऊ युवकांचा मृत्यू झाला. मात्र या त्यापूर्वी त्यांनी व्हॉट्स ऍपवर लिहिलेले स्टेटस चटका लावून जाणारे आहे. जाण्यासाठी तयार (Ready To Go...) असे स्टेट्स त्यांनी टाकले आणि गेले ते कायमचेच !

एकाच वेळी गावातील नऊ युवक ठार झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आणि संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.यवत स्टेशन भागातील विशाल सुभाष यादव , निखिल चंद्रकांत वाबळे , अक्षय चंद्रकांत घिगे , दत्ता गणेश यादव ,  स्टेशन रोड परिसरातील सोनू उर्फ नूर महंमद दाया , परवेझ अशपाक आत्तार , महालक्ष्मी नगर मधील अक्षय भारत वाईकर , गावठाण मधील जुबेर अजित मुलानी व कासुर्डी येथील शुभम रामदास भिसे यांचा भीषण अपघात जागीच मृत्यू झाला.

 काल सकाळी यवत गावातील नऊ युवक वर्षा विहार आणि फिरण्यासाठी रायगड व ताम्हणी घाटाकडे रवाना झाले. सध्याच्या काळात सोशल मिडियाच्या जमान्यानुसार कुठेही गेले तरी सेल्फी काढून व्हाट्स अपला स्टेटस ठेवले जातात .काल यवत मधून फिरण्यासाठी गेलेले युवकही यासाठी अपवाद नव्हते.यवत मधून निघाल्यानंतर सर्व जण लोणी काळभोर येथे योग हॉस्पिटलसमोर थांबले होते. त्यावेळी महामार्गालगत उभे राहून सर्वांनी एकत्रित सेल्फी फोटो घेतला होता.त्यांनी घेतलेल्या फोटो मध्ये नऊ पैकी आठ जण होते. मयतांपैकी परवेझ आत्तार याने त्याच्या व्हाट्स अपवर आठ जणांचा एकत्रित घेतलेला सेल्फी स्टेटस वरून सर्वांबरोबर शेअर केला होता. व्हाट्स अप वरून ठेवलेल्या स्टेटस खाली परवेझ याने "रेडी टू गो" (Ready To Go)  असा संदेश लिहिला होता.संदेश लिहिला. मात्र दुर्दैवाने तोच फोटो त्या मित्रांचा एकत्रित अखेरच्या फोटोंपैकी एक ठरला. तर परवेझ याने लिहिलेला संदेश "Ready To Go" सर्वांच्याच मनाला चटका लावणारा ठरला.

जाताना सेल्फी काढला तेथून काहीच अंतरावर घडला अपघात :या युवकांनी महामार्गालगत उभे राहत  सेल्फी काढला होता.फिरून येत असताना मात्र  जेथे सेल्फी काढला त्या ठिकाणापासून काही अंतरावरच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूsasoon hospitalससून हॉस्पिटल