Pune: नऱ्हे येथे भंगाराच्या गोदामाला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 00:30 IST2023-01-13T00:29:46+5:302023-01-13T00:30:24+5:30
Pune News: नऱ्हे येथील श्री कंट्रोल चौकाजवळ असणाऱ्या एका भंगाराच्या गोदामाला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीची झळ बाजूला असणाऱ्या सोसायटीला ही बसली.

Pune: नऱ्हे येथे भंगाराच्या गोदामाला भीषण आग
पुणे - नऱ्हे येथील श्री कंट्रोल चौकाजवळ असणाऱ्या एका भंगाराच्या गोदामाला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीची झळ बाजूला असणाऱ्या सोसायटीला ही बसली. त्यात खिडक्यांच्या काचा फुटल्या. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची १० अग्निशमन वाहने दाखल झाली आहेत. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.